भिडे गुरुजींचे 'त्या' धारकऱ्याबद्दलचे 'ते' मत

आदरणीय श्री. संभाजीराव भिडे गुरुजी हे नाव महाराष्ट्राला नविन नाही. त्यांच्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे कार्य उभ्या महाराष्ट्रात सुरु आहे. तरुणांमध्ये श्रीशिवछत्रपती - श्रीसंभाजीमहाराज रुजवण्याचे काम त्यांचे धारकरी अत्यंत तळमळीने करत असतात. या संघटनेत पद पैसा आणि प्रसिद्धी या गोष्टीना अजिबात थारा नाही. संपूर्ण वर्षभरातील त्यांचे उपक्रम ठरलेले आणि नियोजित असतात. भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यात येउन ज्यांना अनेक वर्षे झाली असे मुंबई विभागाचे प्रमुख बळवंतराव दळवी यांनी दिलेली ही माहिती "२०१८ ... ठाण्यातील बैठकीसाठी मुंबईतून आदरणीय गुरुजींना घेऊन मी ठाण्यात एका धारकरी बंधूच्या घरी पोहचलो. मुंबईतून आलेल्या धारकऱ्यांनी जेवण करून घेतलं... पण गुरुजींनी "माझा आज उपवास होता तो आज सकाळीच सुटला आता मी अन्नप्राशन करणार नाही !" असं ठामपणे म्हटले आणि एका बाजूला वर्तमानपत्र वाचत बसले. थोडा निवांत वेळ मिळताच मी गुरुजींच्या समोर बसलो... अनेक दिवसांची घालमेल त्यांच्यासमोर मांडली..... "गुरुजी, मुंबईची जबाबदारी माझ्याकडून काढून कोणा दुसऱ्याव...