महात्मा फुले आणि १९ फेब्रुवारीची शिवजयंती

ज्यांना शिवभारतावर विश्वास नाही, जे जेधे शकावली मानत नाही पण जे महात्मा जोतिराव फुलेंना मानतात त्यांच्यासाठीच हा छोटा लेख मांडत आहे. लेख पूर्ण वाचूनच आपले मत मांडावे ही नम्र विनंती राहिल.


आज अनेक जण इंग्रजी तारखेनुसार श्रीशिवछत्रपतींची जयंती साजरी करताना १९ फेब्रुवारीला पहिल्यांदा शिवजयंती साजरी करणारे म्हणून महात्मा फुलेंचा उल्लेख करतात . आणि हे पटवून देण्याकरिता एका चित्रपटातील video दाखवला जातो त्यात महात्मा फुलेंनी १९ फेब्रुवारी १८६९ ला पहिली शिवजयंती साजरी केल्याचं दाखवलं, सांगितले जातं.

पण .....

आता स्वतः महात्मा जोतिराव फुले त्यांनी शिवछत्रपतींवर लिहिलेल्या पोवाड्यात काय लिहितात हे पाहू ....

पंधराशे एकूण पन्नास साल फळलें 
जुन्नर ते उदयांशी आले |
शिवनेरी किल्ल्यांमध्यें बाळ शिवाजी जन्मलें
जिजीबाइस रत्न सापडलें ||



१८६९ साली लिहोलेल्या या पोवाड्यात महात्मा फुले शिवजन्माचा उल्लेख करतात तो १५४९ चा. इथे १५४९ हे शिवजन्माचे इंग्रजी साल नसून ते शालिवाहन शके १५४९ या शिवजन्माच्या हिंदू तिथीचे वर्ष आहे  . आणि जुन्या किंवा पारंपरिक शिवजयंतीचे साल १६२७ आणि शके १५४९ च्या वैशाख महिन्याचे होते. म्हणजे जर महात्मा फुलेंनी जर शिवजयंती साजरी केली असेल तर ती नक्कीच हिंदू तिथीप्रमाणे केली असेल  हे निश्चित समजावे . याला कारण त्यांनी स्वतः हिंदू तिथीचा म्हणजेच त्याकाळी प्रचलित असलेल्या शालिवाहन शके १५४९ चा उल्लेख त्यांच्या शिवाजीचा पोवाडा यात त्यांनी स्वत: केला आहे.

आता तुम्ही म्हणाल मग १९ फेब्रुवारी आणि महात्मा फुलेंचा संबंध कसा आणि कोणी जोडला ?

तर उत्तर स्पष्ट आहे की, मुळातच १९ फेब्रुवारी ही इंग्रजी तारीख फाल्गुन वद्य तृतीया या हिंदू तिथीवरुन आलेली आहे.  फाल्गुनची शिवजन्म तिथीच कागदपत्र फारच उशीरा सापडले होते.. म्हणजेच १९ फेब्रुवारी आणि महात्मा फुलेंचा काहीही संबंध नाही. आता जे महात्मा फुलेंचे नाव घेउन १९ फेब्रुवारीचे जनक म्हणून महात्मा फुलेंच नाव घेत आहेत, ती लोकं महात्मा फुलेंचे नाव घेउन खोट  पसरवत आहेत. 


१९ फेब्रुवारीला Global करण्यासाठी काहीबाही खोट सांगण्यापेक्षा श्री शिवजयंती करायचीच झाली तर तिथीनुसार करा ... कारण स्वतः महात्मा फुलेंनी जर शिवजयंती केली असेल तर ती तिथीनुसारच केली असेल. 

आता एवढ स्पष्ट पुरावे देउनही आणि तुम्ही जर महात्मा फुलेंना मानणारे नसाल तर तुम्ही १९ फेब्रुवारीला शिवजयंती कराल आणि जे महात्मा फुलेंचा शब्द प्रमाण मानतात ते भविष्यात श्री शिवजयंती तिथीनुसारच करतील ! 

               बघा पटत काय तुम्हाला....

                  आपलाच शिवभक्त
                 © बळवंतराव दळवी

©divyadrushtiblogspot.com 2021
____________________________

आमचे इतर सोशल मिडिया AC लिंक
-----------------------------------------------

For more videos go to -
बळवंतराव दळवी
https://www.youtube.com/c/BalwantraoDalvi

Like our Facebook page at -
शिवचरित्र आणि सह्याद्री
https://www.facebook.com/shivcharitranisahyadri/

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??