भिडे गुरुजींचे 'त्या' धारकऱ्याबद्दलचे 'ते' मत

आदरणीय श्री. संभाजीराव भिडे गुरुजी हे नाव महाराष्ट्राला नविन नाही. त्यांच्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे कार्य उभ्या महाराष्ट्रात सुरु आहे. तरुणांमध्ये श्रीशिवछत्रपती - श्रीसंभाजीमहाराज रुजवण्याचे काम त्यांचे धारकरी अत्यंत तळमळीने करत असतात. या संघटनेत पद पैसा आणि प्रसिद्धी या गोष्टीना अजिबात थारा नाही. संपूर्ण वर्षभरातील त्यांचे उपक्रम ठरलेले आणि नियोजित असतात. 

भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यात येउन ज्यांना अनेक वर्षे झाली असे मुंबई विभागाचे प्रमुख बळवंतराव दळवी यांनी दिलेली ही माहिती 

 "२०१८ ... ठाण्यातील बैठकीसाठी मुंबईतून आदरणीय गुरुजींना घेऊन मी ठाण्यात एका धारकरी बंधूच्या घरी पोहचलो.  मुंबईतून आलेल्या धारकऱ्यांनी जेवण करून घेतलं... पण गुरुजींनी "माझा आज उपवास होता तो आज सकाळीच सुटला आता मी अन्नप्राशन करणार नाही  !" असं ठामपणे म्हटले आणि एका बाजूला वर्तमानपत्र वाचत बसले. थोडा निवांत वेळ मिळताच मी गुरुजींच्या समोर बसलो... अनेक दिवसांची घालमेल त्यांच्यासमोर मांडली..... "गुरुजी, मुंबईची जबाबदारी माझ्याकडून काढून कोणा दुसऱ्यावर द्या, गुरुजी मुंबई प्रमुख बदला !"
गुरुजींनी माझ्याकडे पाहिलं ... "बळवंतराव, काही त्रास असेल तर सांगा ... माझ्यावर विश्वास आहे ना ?"
अत्यंत प्रामाणिकपणे मी गुरुजींना माझा विषय सांगितला ... गुरुजी नेहमीप्रमाणे छान हसले...  माझे हात जोडले गेले .. गुरुजींना पुन्हा विनंती केली. अत्यंत नम्रपणे 'माझ्या मनात' असलेली मुंबई प्रमुख पदासाठी साजेसे असणाऱ्या काही धारकऱ्यांची नावे मी गुरुजींना सुचवली... पुन्हा एकदा गुरुजी छान हसले....... मी थोडा विचारात पडलो... कदाचित गुरुजींच्या मनात वेगळी नावे असावीत....... म्हणून मी गुरुजींना विचारलं... "गुरुजी, तुमच्या मनात कोणा दुसऱ्याचे नाव असेल तर तेही सांगा....... "

गुरुजींनी मला आणखी जवळ बोलावले आणि अत्यंत शांतपणे म्हणाले.. "बळवंतराव, माझ्या मनात एक नाव आहे."  मीही उत्सुकपणे त्यांना त्या नावाबद्दल विचारलं.... उत्तर आलं.... "सांगतो .... मुंबई प्रमुख म्हणून माझ्या मनात नाव आहे ते...... बळवंतराव दळवी..... !" मी पुन्हा हात जोडले...... "गुरुजी, मनापासून सांगतो... मुंबई प्रमुख बदला... काही काळ तरी दुसऱ्याला ही जबाबदारी द्या !"

"बळवंतराव, तुमचे नाव मी सुचवलेले नाहीय ! ही इच्छा माझी नसून ही इच्छा श्रीशिवछत्रपतींची आहे की तुम्ही मुंबई प्रमुख म्हणून कार्य करा !"

 ....... यापुढे आणखी काय बोलणार ? 
मी गुरुजींच्या चरणावर डोकं टेकवलं....


कार्य करत असताना समाज माध्यमावर म्हणजेच सोशल मिडियावर छोटेमोठे वादविवाद होत राहतात. मुंबई बाहेरील काही महाभागांनी मुंबईच्या सुरु असलेल्या चांगल्या कार्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मी स्वतः असं ठरवल होतं की, कदाचित मी प्रमुख असल्याने काहीजणांना त्रास होतोय... मी पदावरून दूर झालो की त्यांची तोंडे बंद होतील असा विचार करून मी पुन्हा २०१९ पुणे येथील वारकरी धारकरी संगमावेळी काही गोष्टी ठरवून गेलो होतो.

मी माझे बालपणीचे मित्र आणि धारकरी श्री. नितीन पालशेतकर यांच्यासोबत उभा होतो. गुरुजींना शोधणारी नजर ऐके ठिकाणी थांबली..... आदरणीय गुरुजी रस्त्यावर धारकऱ्यांमध्ये बसले होते.  मी गुरुजींच्या जवळ गेलो..... गुरुजींच्या चरणावर डोकं टेकवलं.... माझ्याकडे पाहात आनंदी स्वरात "बळवंतराव, कसे आहात ?" अस छान हसून बोलून गुरुजींनी मुंबईतून आलेल्या धारकऱ्यांची चौकशी केली. आणि मी त्यांच्यासमोर हात जोडून म्हणालो, "गुरुजी, तुम्हाला मागे मी एक विनंती केलेली त्यावर निर्णय घ्या ! गुरुजी मुंबई प्रमुख पद बदला......"

गुरुजींची भेदक नजर माझ्यावर खिळली... मला त्यांनी स्पष्ट शब्दात एक प्रश्न केला ......
"बळवंतराव, सुर्याला पर्याय असतो का ? अहं ......." 
माझ्या डोळ्यात पाणी आलं.  हात जोडून भरलेल्या डोळ्यांनी मी गुरुजींना पुन्हा विनंती केली.... त्यावर गुरुजींनी अत्यंत निश्चयी शब्दात मला उत्तर दिले... "बळवंतराव, सुर्याला पर्याय नाही.  तुमच्याकडे दुसरा सुर्य असेल तर माझ्याशी यावर बोलायला या.... आता तुम्ही निघा... यावर चर्चा नाही !"
काय बोलणार होतो मी यापुढे ? निशब्द करणाऱ्या, उत्तर नसलेल्या प्रश्नांची काय उत्तर  द्यायची ??? गुरुजींना पुन्हा मुंबई प्रमुख बदला असं म्हणायची संधीच गुरुजींनी माझ्याकडून काढून घेतली होती. खरतर एका प्रमुखाच्या आधी मी एक धारकरी आहे. प्रतिष्ठानचे भले ते आम्हा धारकऱ्यांचे भले हे मी ठामपणे जाणतो..... 

गुरुजींशी बोलताना एक जाणवलं, भले जग तुमच्या विरोधात असूद्या तुम्ही सच्चे आहात तेव्हा आदरणीय गुरुजी तुमच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहतील .... यासाठी गुरुजींचा आपल्यावर असलेल्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही हे कायम लक्षात ठेवायला हवं …… जर माझ्या विरोधात वैयक्तिक द्वेषापोटी १०० लोकं गुरुजींकडे गेली आणि माझी तक्रार करत "बळवंतराव मुंबई प्रमुख म्हणून नको"'  असं म्हणाले तेव्हा माझ्यावर विश्वास असणारे गुरुजी त्या १०० लोकांचे ऐकणार नाही !
पण..... 
पण ... मी आदरणीय गुरुजींचा  विश्वासाला  तडा दिला असेल तर....... माझ्या समर्थनार्थ १ हजार लोकं जरी गुरुजींकडे जाऊन माझं समर्थन करु लागली तरीही आदरणीय गुरुजी त्या हजार लोकांचेही ऐकणार नाही....  

श्रीशिवप्रतिष्ठान आणि धारकरी या नावाचा वापर आपल्या स्वार्थासाठी Office of Profit म्हणून करणारे जिथं कमी नाही तिथं माझ्यासारखा माणूस देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगराचे प्रमुख पद स्वतःहून सोडायला तयार झाला होता. कारण पदाला गोचडी सारखं चिटकून बसणे हे आम्हाला कार्यात कधी शिकवलेच गेले नाही. शिवप्रतिष्ठान मध्ये 'धारकरी' हेच सर्वोच्च पद आहे ! 

माझ्यासारखा १० बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्याकडे, ज्याच्याकडे कोणतेही आर्थिक बळ नाही अशा अत्यंत सामान्य धारकऱ्याला गुरुजींनी मुंबई प्रमुख बनवलं होत ते त्यांचा माझ्यावरील असलेला विश्वास हेच एकमेव कारण होतं ! अशा विश्वासाला तडा जाऊ द्यायचे नाही हे प्रत्येक धारकऱ्यांनी लक्षात ठेवावं ! 

           ( १९ डिसेंबर २०२० )

©Divyadrushti.blogspot.com 2021 

टिप्पण्या

  1. सुर्यात अंधार नाही, त्या पद्धतीच कार्य म्हणजे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शिव शंभू रक्तगटाची पिढी उत्पन्न करणारी एकमेव शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संस्था,

    खर तर प्रतिष्ठान मधला प्रत्येक जण स्वतःला धारकरी म्हणवतो, तर त्या धारकऱ्याने स्वतःला एक प्रश्न नेहमी विचारणे की माझ्यामुळे कुठे प्रतिष्ठान ला गाल बोट लागतंय का!

    उत्तर द्याहटवा
  2. बळवंतराव दळवी दादा...

    भक्तीशक्ती संगमात तुमच्या सोबत असताना हजारोंच्या गर्दीत गुरुजींना शोधणारी तुमची नजर आणि तुमच्या मनात असलेला प्रश्न तुम्ही गुरुजींकडे मांडणार आणि गुरुजी त्याचे उत्तर काय देणार हे थोडंबहुत मी जाणून होतोच पण तुमची तळमळ बघवत नव्हती, परंतु आपण गुरुजींना भेटल्यावर गुरुजींच्या अमृतवाणीतून तुमच्या प्रती असे काही शब्द त्यावेळी कानावर पडले की जणू मनाला आनंद झाला आणि गुरुजींचे आशीर्वाद घेऊन तिथून निघून धारकऱ्यांच्या गर्दीत मिसळून गेलो...

    गुरुजींचा तुमच्यावर असणारा विश्वास आणि तुमची गुरुजींच्या प्रती असलेली निष्ठा तुम्ही गुरुजींच्या चरणी वाहिली आहे...

    ही तर श्रींची इच्छा....

    म्हणून तुमचे मुंबई प्रमुख पद कायम आहे...

    सूर्याला दुसरा पर्याय नाही दादा...

    ____/\____

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान लागते लेख,, निस्वार्थी गुरुवर्यांचे धारकरीहि निस्वार्थी👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम 👌👌
    तुम्हाला सतत पाण्यात पाहणाऱ्यां
    करिता सणसणीत चपराकच ...!!!

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान लेख दादा ....नक्कीच आपण श्री शिवरायांना अपेक्षित असे कार्य करूयात

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??