शिवछत्रपतींच्या सुवर्ण सिंहासनाची आज गरज काय ?
हा प्रश्न अनेकांकडून सातत्याने शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांना विचारला जातो. सोबतच 'असा निधी एकत्र करून गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हायला हवे, गोरगरिबांना मदत करायला हवी' वैगरे वैगरे मतप्रवाह अनेकांकडून व्यक्त झालेले दिसून आले आहे.
यावर आम्ही मुंबईतील धारकरी आणि शिवचरित्राचे अभ्यासक बळवंतराव दळवी यांच्याशी यासंदर्भात विचारले असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, "शिवछत्रपतींनी त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते विधिवत सिंहासनाधिश्वर छत्रपती झाल्यानंतर औरंगजेबाने ज्यांना बळाने बाटवून मुसलमान केले होते अशा नेतोजी पालकरांना शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वधर्मात घेतले. हे शिवछत्रपतींनी का केलं असावं ? दुसऱ्या बाजूला महाराजांनी आपल्या व्यावहारात घुसलेले परकीय शब्द काढून टाकून आपले शब्द वापरता आणण्यासाठी 'राज्यव्यवहारकोश' तयार केला. हा राज्यव्यवहारकोश महाराजांनी का तयार केला ?
उत्तर फार सोपं आहे ....
शिवाजी महाराज मुसलमानी जुल्मी सत्तेविरूद्ध लढून छत्रपती राजे झाले होते त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आहे आणि स्वतःची सत्ता आल्यावर जर आपण आपल्या लोकांना स्वधर्मात घेउ शकलो नाही तर सत्तेत येउन उपयोग काय ?
जर आपल्यात घुसलेले परकीय शब्द फेकून देउन आपले शब्द वापरु शकलो नाही तर राज्याभिषेक करून विधीवत छत्रपती तरी का झाले असते ?? जुल्माने बाटलेल्या आपल्या लोकांना स्वधर्मात घेणारे पहिले राजे शिवछत्रपती होते ... परकीय शब्द फेकून देणारे शिवछत्रपती हे अखिल हिंदुस्थानातील पहिले हिंदू राजे होते .........
एक लक्षात घ्या ... देशात भाजपाचे मोदी सरकार आले आहे .. सत्तेत आल्यावर ३७० कलम हटवले नसते तर त्यांच्यात आणि आधीच्या सरकारमध्ये फरक काय राहिला असता ? उत्तर प्रदेशात योगीजींचे सरकार आहे त्यांनी अनेक शहरांची नावे बदलून त्यांची मुळ नावे पुन्हा दिली ... अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण सुरु झाले आहे ... महाराष्ट्रात आज शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे.. ही त्यांची इच्छा जर शिवसेना पुर्ण करणार नसेल तर सत्तेवर येउन उपयोग काय ?? सत्तेत आल्यावर आपल्या धर्मकार्याला विसरु नये...
शिवछत्रपतींनी घालून दिलेला धडा आपण नाही पुर्ण करायचा तर मग कोण करणार ? देश स्वतंत्र झाल्यापासून अगदी त्याआधीही एकालाही असं वाटलं नाही की या देशात मुसलमानी राजवटीत ३५० वर्षानंतर उभारलेले जे हिंदू राजा शिवछत्रपतींचे सिंहासन औरंगजेबाने बळाने तोडलं फोडलं ते पुन्हा निर्माण करायला हवं ? असं व्हायला हवं असं ज्यांच्या मनात पहिल्यांदा आले ते आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी हे या देशातील पहिले व्यक्ती ...
त्यांनी लोकवर्गणीतून, लोकसभागातून हे सिंहासन पुन्हा पुर्नसंस्थापित करायच ठरवल त्यात चुकीचे काय आहे ? देश स्वतंत्र झाल्यावर आपली राष्ट्र प्रतिके पुन्हा उभी राहात असतील तर लोकांनी त्यात स्वतःहून हातभार लावायला हवा ! आपल्या महाराष्ट्राची अस्मिता असणारे श्रीशिवछत्रपती त्यांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्याचे प्रतिक ते सुवर्ण सिंहासन प्रत्येक हिंदूनी पुढाकार घेउन पुन्हा निर्माण करायला हवं .. पण दुर्दैव असे की असे फार कमी लोकांना वाटतं... शिवछत्रपतींची जयंती केली की झालं, संपलं आमचं शिवप्रेम... !
इस्लामी सत्तेला आव्हान देत निर्माण झालेले शिवछत्रपतींचे सुवर्ण सिंहासन पुर्न संस्थापित झाल्यावर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारवर न टाकता त्याची जबाबदारी महाराष्ट्रातील तमाम जनता घेणार आहे .. दररोज किमान ४००० धारकरी किल्ले रायगडावर त्या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी खडा पहारा देणार आहेत ! आपण आज फक्त एकदा दिलेल्या कर्तव्य निधीतून उभं राहणारे हे राष्ट्रप्रतिक शिवछत्रपतींचे सुवर्ण सिंहासन आपल्या घराशी, आपल्या कुटुंबाशी, आपल्या पिढ्यानपिढ्या एक अतूट नातं जोडणारे ठरणार आहे...!
©divyadrushtiblogspot 2021
आम्ही योगदान दिल आणि अजुनही देऊच कारण हे आद्यकर्तव्य आहे
उत्तर द्याहटवातुम्हा धारकऱ्यांचे कार्य शिवछत्रपतींना अभिप्रेत असलेले असेच आहे !
हटवामंदिर बाधण नक्कीच योग्य पण ते टिकवण्यासाठी जी प्रेरणा मिळते ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांन कडूनच ह्याला इतिहास साक्ष आहे....आणि अश्या शक्तीच शक्ती पीठ उभ करण म्हणजेच सुवर्ण सिंहासन पुनर्निर्माण करणे हे राम मंदिर निर्माण इतकंच... नव्हे नव्हे कणभर जास्तच आपलं म्हणजे च समस्त हिंदू जनांच आद्य कर्तव्यच...आणि मला अभिमान आहे की हे कर्तव्य मी पार पाडलय...
उत्तर द्याहटवानक्कीच... सत्य आहे !
हटवामोजक्या शब्दात सुवर्ण सिहासनाची आवश्यकता तुम्ही मांडली आहे त्याबद्दल तुमचे कौतुक करायलाच हवं...!
उत्तर द्याहटवाया विवेचनात अजून भर घालायची झाल्यास असं सांगता येईल की लोकांच्या मनातील सुप्त अवस्थेत असणाऱ्या शिवभक्तीचा उर्जित अवस्था देण्यासाठी या सिहांसनाची अत्यंत आवश्यकता आहे.
जय भवानी जय शिवराय⛳️🙏🏻
उत्तर द्याहटवाजय शिवराय
हटवाशिवछत्रपतींचे सुवर्ण सिंहासन हे सर्वांसाठी प्रेरणास्थान असुन याची अत्यंत आवश्यकता आहे.
उत्तर द्याहटवाजय शिवराय
हटवाशककर्ते श्रीमान छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे सुवर्ण सिंहासन रायगडावर पुनर्स्थापीत का केले पाहिजे याबद्दलची उत्कृष्ट माहिती आपण दिली आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाजय शिवराय
सूवर्णसिंहासन हे होणारच ते ही लवकरच
उत्तर द्याहटवाजय शिवराय
हटवाराज्याभिषेक करून महाराज फक्त महाराष्ट्रपुरतेच मर्यादित छत्रपती झाले न्हवते ते हिंदुस्थानातील समस्त हिंदूजनांचे छत्रपती होते..राष्ट्रप्रेमाची प्रेरणादेणारे सिंहासन आज पुन्हा उभं राहतं आहे तर इतर राज्ये का मागे राहत असतील.. लवकरच असेच लेख हिंदी भाषिकांसाठी यायला हवेत.. राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसूर्यजाळ...
उत्तर द्याहटवाआम्ही हिंदीतही असे लेख पसरवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करु
हटवासहमत
उत्तर द्याहटवासहमत
उत्तर द्याहटवाया हिंदुस्थानात आपला बाप शंभूमहादेव यांची एकूण १२ ज्योर्तिलिंग आहेत. आणि अनेकदा ती देवस्थानं इस्लामी आक्रमकांनी लुटली परंतु नेहमीच त्यांचा जिर्णोद्धार केला गेला. परंतु ही १२ ज्योर्तिलिंग ज्यांच्यामुळे टिकून राहिली ते आपले १३वे आणि १४वे ज्योर्तिलिंग म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. पण गेली ३५० वर्षानंतर या आपल्या बापाचं सिंहासन जिथे वाकल्या आणि झुकल्या गर्विष्ठ माना ते सुवर्णसिंहासन आज गुरूजींच्या संकल्पनेतून आणि लाखो धारकऱ्यांच्या कार्यातून साकार होत आहे. छत्रपती साठी आपणं देऊ तितक कमीच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून या सिंहासना साठी तन,मन आणि धन देणं गरजेच आहे. चला अर्पण करू तन,मन,धन आणि साकारू हिंदवी स्वराज्याचे ३२मन सुवर्णसिंहासन.
उत्तर द्याहटवा