पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेक्सपियरचे जगप्रसिद्ध हॅमलेट नाटक आणि भगवदगीता

इमेज
प्रसिद्ध इंग्रजी नाटककार शेक्सपियर याच्या ' हॅमलेट ' या जगप्रसिद्ध नाटकात डेन्मार्क देशाचा राजपुत्र हॅमलेट याच्या चुलत्याने राज्यकर्ता आपल्या सख्ख्या भावाचा म्हणजे हॅमलेटच्या वडिलांचा खून करून व आपल्याच भावाच्या पत्नीशी हॅमलेटच्या आईशी लग्न करून राजगादीही बळकावली होती. आपल्या वडिलांना मृत्यू प्रसंगी दिलेला शब्द पाळायचा आणि त्या पापी नराधमाचा वध करून वडिलांच्या ऋणातून पुत्रधर्मातून मुक्त व्हावे, कि सख्या चुलता, आपल्या आईचा दुसरा नवरा आपला सावत्र बाप, आणि तख्तावर विराजमान असलेला राजा म्हणून त्याची गय करावी या द्विधा मनस्थितीत पडून कोवळ्या मनाच्या तरुण हॅमलेटची काय अवस्था झाली यावर ते नाटकं आहे.  ' to be or not to be .... जगावं कि मरावं ' अशा विवंचनेत त्या बिचाऱ्या हॅमलेटला वेड लागून त्याचा अंत झाला .... असं ते जगप्रसिद्ध नाटकं उभ्या जगाने डोक्यावर घेतलं ! आपण भारतीय नेहमीच दुसऱ्या परदेशी लोकांवर जास्त विसंबून राहतो आणि ते काय लिहितात सांगतात यावर फार लक्ष देतो. आपल्याकडे काय चांगल आहे याचा आपण भारतीय फार विचार करत नाही ! महाभारतात ऐन युध्दभुमीवर अर्जुनाने समोर...

हिंदू मंदिराच्या सरकारीकरणाचा निषेध - श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव तर्फे आंदोलनाचा इशारा

इमेज
हिंदू मंदिरांचे सरकारीकरणाचा आदेश मागे घेतला गेला नाही तर श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे आंदोलनाचा इशारा बेळगाव: बेळगाव शहर सोबतच इतर १६ जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थानांवर सरकारी प्रशासक नेमण्याचा आदेश धर्मादाय विभागाने दिला आहे. प्रशासनाच्या या आदेशामुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उमटत आहे. हिंदू मंदिरातील सरकारी हस्तक्षेपाला भाविकांनी विरोध केला आहे. फक्त हिंदू मंदिरांचे सरकारीकरण करून चर्च आणि मशीदींना वगळण्यात आले आहे. या सर्व प्रकाराचा श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने जाहिर निषेध नोंदवला आहे.  हिंदूचीच मंदिरे ताब्यात घेताना सरकारमध्ये धमक असेल तर त्यांनी मुसलमान, ख्रिश्चन यांचीही धार्मिक स्थळे सरकारने आपल्या ताब्यात घेऊन त्यांचे सरकारीकरण करून दाखवावे.  आणि जर तसे करण्याची धमक सरकारमध्ये नसेल तर त्यांनी मंदिरांचे सरकारीकरण रद्द करा. हिंदूंच्या मंदिरातील पैसा अल्पसंख्याकावर उधळत आहेत. हिंदूचे शोषण आणि अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करणारे हे सरकार आहे. हिंदू मंदिरांचे सरकारीकरण आदेश मागे घेतला गेला नाही तर शिवप्रतिष्ठानतर्फे आंदोलनाचा इशारा बेळगाव जिल्हा प्रम...