हिंदू मंदिराच्या सरकारीकरणाचा निषेध - श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव तर्फे आंदोलनाचा इशारा

हिंदू मंदिरांचे सरकारीकरणाचा आदेश मागे घेतला गेला नाही तर श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे आंदोलनाचा इशारा

बेळगाव:

बेळगाव शहर सोबतच इतर १६ जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थानांवर सरकारी प्रशासक नेमण्याचा आदेश धर्मादाय विभागाने दिला आहे. प्रशासनाच्या या आदेशामुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उमटत आहे. हिंदू मंदिरातील सरकारी हस्तक्षेपाला भाविकांनी विरोध केला आहे. फक्त हिंदू मंदिरांचे सरकारीकरण करून चर्च आणि मशीदींना वगळण्यात आले आहे. या सर्व प्रकाराचा श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने जाहिर निषेध नोंदवला आहे. 


हिंदूचीच मंदिरे ताब्यात घेताना सरकारमध्ये धमक असेल तर त्यांनी मुसलमान, ख्रिश्चन यांचीही धार्मिक स्थळे सरकारने आपल्या ताब्यात घेऊन त्यांचे सरकारीकरण करून दाखवावे.  आणि जर तसे करण्याची धमक सरकारमध्ये नसेल तर त्यांनी मंदिरांचे सरकारीकरण रद्द करा. हिंदूंच्या मंदिरातील पैसा अल्पसंख्याकावर उधळत आहेत. हिंदूचे शोषण आणि अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करणारे हे सरकार आहे. हिंदू मंदिरांचे सरकारीकरण आदेश मागे घेतला गेला नाही तर शिवप्रतिष्ठानतर्फे आंदोलनाचा इशारा बेळगाव जिल्हा प्रमुख श्री. किरण गावडे यांनी दिला. 

मुसलमान, ख्रिश्चन, बौध्द, जैन, शीख, आणि पारसी आदींना वगळून केवळ हिंदूंची मंदिरे सरकारने ताब्यात घेण्याची कृती भारतीय घटनेच्या समानतेच्या तत्वाला काळीमा फासणारी आणि संविधानाच्या मुळ गाभ्याच्या विरोधातील आहे. केवळ हिंदुच्याच मंदिरांचे सरकारीकरण का ? अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचे सरकारीकरण का नाही ? असा सवाल गावडे यांनी केलाय.

 ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या धर्मादाय विभागाच्या बैठकीत आणखी २५ देवस्थानांवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली संदर्भात निर्णय घेण्यात आला होता अशी माहिती दिव्यदृष्टीला मिळाली. त्यानुसार बेळगावसह एकूण १६ देवस्थानांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय देण्यात आला आहे.

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील तसेच देवस्थान कामकाजात सरकारचा थेट हस्तक्षेप हे नाराजीचे कारण ठरत आहे. या सरकारी निर्णया विरोधात न्यायालयीन लढा देण्याची तयारी मंदिर देवस्थान कमिटीकडून सुरु आहे. या सर्व गोष्टीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी मंदिर कमिटीकडून निवेदन पत्र पाठवले जाणार आहे ! सरकारने हा आदेश रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा या प्रसिद्ध मंदिरांनी दिला आहे.

©divyadrushti.blogspot.com 2021 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??