शेक्सपियरचे जगप्रसिद्ध हॅमलेट नाटक आणि भगवदगीता

प्रसिद्ध इंग्रजी नाटककार शेक्सपियर याच्या 'हॅमलेट' या जगप्रसिद्ध नाटकात डेन्मार्क देशाचा राजपुत्र हॅमलेट याच्या चुलत्याने राज्यकर्ता आपल्या सख्ख्या भावाचा म्हणजे हॅमलेटच्या वडिलांचा खून करून व आपल्याच भावाच्या पत्नीशी हॅमलेटच्या आईशी लग्न करून राजगादीही बळकावली होती. आपल्या वडिलांना मृत्यू प्रसंगी दिलेला शब्द पाळायचा आणि त्या पापी नराधमाचा वध करून वडिलांच्या ऋणातून पुत्रधर्मातून मुक्त व्हावे, कि सख्या चुलता, आपल्या आईचा दुसरा नवरा आपला सावत्र बाप, आणि तख्तावर विराजमान असलेला राजा म्हणून त्याची गय करावी या द्विधा मनस्थितीत पडून कोवळ्या मनाच्या तरुण हॅमलेटची काय अवस्था झाली यावर ते नाटकं आहे. 

'to be or not to be .... जगावं कि मरावं' अशा विवंचनेत त्या बिचाऱ्या हॅमलेटला वेड लागून त्याचा अंत झाला .... असं ते जगप्रसिद्ध नाटकं उभ्या जगाने डोक्यावर घेतलं !


आपण भारतीय नेहमीच दुसऱ्या परदेशी लोकांवर जास्त विसंबून राहतो आणि ते काय लिहितात सांगतात यावर फार लक्ष देतो. आपल्याकडे काय चांगल आहे याचा आपण भारतीय फार विचार करत नाही !

महाभारतात ऐन युध्दभुमीवर अर्जुनाने समोर आपले आप्तेष्ट पाहताच हातातील शस्त्र खाली ठेवून भगवान श्रीकृष्णासमोर हतबल होउन गुडघे टेकले. आपल्याच भावांना, गुरुंना आप्तेष्टांना मारून काय जिंकणार ? असा प्रश्न त्याला भेडसावू लागला तेव्हा श्रीकृष्णाने त्याला भगवद् गीता सांगून योग्य मार्गदर्शन केले. ते ऐकत असताना द्विधा मनस्थितीत अडकलेला अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला,

व्यामिश्रेणेव वाक्येन बुध्दिं मोहयसीव मे |
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोsहमाप्नुयाम ||
                         - अध्याय ३ श्लोक २ 

अर्थ - 
हे कृष्णा ! मला दोन चार मार्ग सांगून घोटाळ्यात न पाडता त्यापैकी जो श्रेयस्कर ( सोयीस्कर नव्हें ) असेल तो एकच निश्चय करून सांग !

भगवद् गीतेत 'हे की ते - असं किंवा तसं' अजिबात नाही ! ठोस आणि एकच विशिष्ट मत प्रतिपादन केलेले आहे हे उघडं दिसते. 

त्या शेक्सपियरने जर आपल्या भगवद् गीतेचा अभ्यास केला असता तर त्याला त्याच्या नायकाला आपलं धर्मकर्तव्य काय आहे हे न ओळखता असं भ्रमिष्ट दाखवण्याची त्याच्यावर वेळ आली नसती. श्रीकृष्णासारखा मार्गदर्शक पाठिराखा असेल तर काय घडतं हे आपला महाभारत ग्रंथ सांगतो. 

महाभारतात जे नाही ते कोठेही नाही !
जगात घडलेल्या कोणत्याही गोष्टीवर महाभारतात अनेक प्रकरणाच्या प्रसंगाची खाणचं आहे. कोणत्याही काळात लागू पडणारें त्रिकालाबाधित ज्ञान सांगणाऱ्या गीतेसारखा ग्रंथ आजही मनुष्याला नव नवे स्फुरण प्राप्त करून देत आहे ! सूक्ष्म अतिसूक्ष्म गोष्टींचा अनेक समयी घडणाऱ्या अनेक गोष्टीचा यात समावेश आहे फक्त आपल्याकडे काय आणि किती चांगल आहे याचं ज्ञान आपल्या भारतीयांना नाही.

              ✍️ - बळवंतराव दळवी 

©divyadrushti.blogspot.com 2021

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??