शिवछत्रपती गो- ब्राह्मण प्रतिपालक वाद
. गो - ब्राह्मणप्रतिपालक
शिवछत्रपतींनी देवाचे, धर्माचे, देशाचे, गाईंचे, प्रजेचे, ब्राह्मणांचे, आणि स्त्रीयांचे रक्षण केले हे ऐतिहासिक सत्य आहेच ....
पण ...
शिवकाळात शिवछत्रपतींनी जेव्हा सिंहासनारोहण केले तेव्हा त्यांनी स्विकारलेली बिरुदावली 'क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज' हीच बिरुदावली स्विकारली होती हेही सत्य आहे जे कोणीही नाकारत नाही ....
तरीही ....
जसे समर्थ रामदास स्वामी यांनी शिवछत्रपतींना उद्देशून त्यांना 'शिवराय, श्रीमंत योगी, जाणता राजा संबोधतात कारण समर्थ रामदास स्वामींना शिवछत्रपतीं त्याच रुपात दिसले म्हणून ते तस म्हणतात. तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या बाकरे शास्त्रींच्या दानपत्रात शिवछत्रपतींचा उल्लेख म्लेंच्छक्षयादिक्षित, आपले पणजोबा मालोजीराजे भोसले यांचा उल्लेख देवब्राह्मण प्रतिपालक असा उल्लेख करतात. आपल्या आजोबांचा शहाजीराजांचा उल्लेख हिंदू धर्माचा जीर्णोद्धार करणारे म्हणतात याचा अर्थ स्पष्ट आहे की, संभाजीराजांना हे ठाऊक आहे की, शिवरायांनी म्लेंच्छ म्हणजेच मुसलमानांना संपवण्यासाठी प्रयत्न केले म्हणून संभाजीराजे शिवछत्रपतींच्याबद्दल तस म्हणतात. संभाजी महाराज त्यांच्या बुधभूषण मध्ये शिवछत्रपतींचा उल्लेख गोब्राह्मण पालक म्हणून करतात.
काही उपाधी, भुषणे शिवकाळात इतर जनतेनेही दिली होती ... ज्या ब्राह्मणांचे शिवछत्रपतींनी रक्षण केले त्यांनी गो-ब्राह्मण प्रतिपालक ही उपाधी शिवछत्रपतींना दिली.
आता सध्याचेच काही वेगळी उदाहरणे पाहू ...
ज्योतिबा फुले आणि मोहनदास करमचंद गांधी यांच्या नावापुढे महात्मा ही उपाधी लावली जाते ती काय त्यांनी स्वतःहुन लावली आहे काय ? कि त्यासाठी त्यांनी स्वतःचा नामकरण विधी केला होता ? नाही ना ? पण तरीही त्यांच्या नावापुढे महात्मा ही उपाधी लावली जातेच ना ? कारण ती लोकांनी त्यांना दिली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे नाव भीमराव रामजी आंबेडकर हे आहे. लोकांनी त्यांना बाबासाहेब ही उपाधी दिली जी आपण आजही वापरतो .... त्यांनी ती स्वतःहून लावली नाही म्हणून मग ती वापरायची नाही काय ? बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकावर ते स्वतःचे नाव बी. आर. आंबेडकर असं लिहित. म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर याचा अर्थ ते स्वतःच्या नावापुढे बाबासाहेब ही लोकांनी दिलेली उपाधी ते स्वतः वापरत नव्हते. जर ते स्वतः वापरत नव्हते म्हणून लोकांनी त्यांना बाबासाहेब आंबेडकर म्हणू नये काय ? अगदी तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत सुध्दा हेच आहे. मात्र फक्त शिवछत्रपतींच्या बाबतीतच वाद का घातला जातो ?
काही लोकांच विचित्रच असत, ऐके ठिकाणी असं म्हणायच की ब्राह्मणांनी शिवरायांचा अपमान केला वैगेरे वैगरे... पण जिथ स्वतः ब्राह्मणच अस म्हणत आहेत की शिवछत्रपती हे आमचे पालक आहेत मग यावर आक्षेप का ? उलट अभिमान वाटायला हवा ना ? शिवछत्रपतींनी देवाचे, धर्माचे, देशाचे, गाईंचे, प्रजेचे, ब्राह्मणांचे, आणि स्त्रीयांचे रक्षण केले हे इतिहास सिद्ध आहे म्हणूनच तर शिवछत्रपतींना तस संबोधले जाते ... रक्षण न करताच उगाच कोणी कोणाला तशी उपाधी देइल काय ? एखाद्याने दिलेली उपाधी जर स्वतः शिवछत्रपतीनी अमान्य केली नसेल तर त्यावर आक्षेप घेणारे आपण कोण ?
एका बाजुला मोगल, आदिलशाही वैगरे मुसलमान लोकं गाई - बैल मारून खात असताना दुसरीकडे शिवछत्रपती हे हिंदू राजे होते. त्यांनी गाईंचे रक्षण केले त्यात चुकीचे काय आहे ? ज्या ब्राह्मणांना शिवछत्रपती हे आपले रक्षणकर्ते पालनहार वाटतात तर त्यावर कोणाला आक्षेप घेण्यासारखे काय आहे ?
आज ज्याला वाटलं त्याने शिवछत्रपतींना
गो - ब्राह्मण प्रतिपालक म्हणावं ज्याला वाटत तस नाही म्हणायच तर नका म्हणू यामुळे इतिहासाची तोडमोड वैगरे काही होणार नाहीय ..... अकारण वाद घालणे थांबवा !
©बळवंतराव दळवी
२१ नोव्हेंबर २०१९
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा