श्री नर्मदा परिक्रमा आणि भिडे गुरुजींचा धारकरी
साधारण माणसांचा एकदाच जन्म होतो.
जन्म, शिक्षण, लग्न, पोरंबाळ, संसार, म्हातारपण आणि शेवटी मरण ! यात विशेष असं काहीच नसत .आमचाही पहिला जन्म असाच झाला. सगळचं साधारण ! या साधारण आयुष्याच्या वाटेवर आम्हांला भिडे गुरुजी नावाच्या तरूण म्हाताऱ्याने आमच्या हातात शिवचरित्र ठेवलं. सत्व, स्वाभिमान, देव, देश, धर्म हळूहळू समजु लागला. इतिहास आवडु लागला. या गुरूजींनी आम्हांला शिवकाळ दाखवला. सह्याद्री दाखवला. आंम्हाला मोहिम नावाचा संजीवनी मंत्र आमच्या अंगात भिनवला. मनं पेटवल. धमन्या फरफरु लागल्या.
भिडे गुरुजी म्हणजे राष्ट्रतेजाचा झंझावात. लाखो तरुणांना शिवप्रभुंची वाट दाखवणारा हाच तो अवलिया! हजारो तरुणांना निर्व्यसनी बनविणारा हाच तो संत.
नेहमी खरं बोलायला लावणारा हाच तो महंत ! बाकी साधु , संत ,मंहाताची व्याख्या अनेक बैलांना न समजण्याच्या पलिकडची आहे.
मुर्दाड जिवन जगणाऱ्या लोकांना संतमहंताची व्याख्या सहसा समजणार नाही. हे दुर्देव आहे महाराष्ट्रच ........ महाराष्ट्राला शिवछत्रपती सुध्दा अजुनही समजले नाहीत. समजले असते तर महाराष्ट्र काही औरच असता.
इथ शिवछत्रपतींच नाव फक्त राजकारणासाठी वापरतात. दलिदंर राजकारण आणि गांडु पुढारी म्हणजे वाटोळ्यांच प्रमुख कारण. इथ शुर , लढवय्या समजल्या जाणाऱ्या मराठा समाजाच्या नवतरूण पोरांना पक्षीय गुलाम बनवलं गेल. आमची पोरं आता पुरती फसली आहे .... इंग्रजांनी आपल्यावर केलेल दिडशे वर्षाच्या राज्य आणि गुलामगिरी पेक्षा कैक पटींनी महाभयंकर इथले राजकीय नेते सध्या समाज, राष्ट्र, देश नासवण्याचे कार्य करत आहे. कशाचाच कशाला मेळ साधेना !
असो ........ राजकारण हा आपला पिंड नाही !
आमचा पहिला जन्म असाच साधारण झाला .
खाओ पिओ मज्जा करो. बाकी दुनिया गेली तेल लावत.
आमची भाषा नेहमीच कोलाकोलीची असायची कारण आमच्या गांडीत सुलेमानी किडा वळवळ करायचा. या साधारण आयुष्यात शिवछत्रपतीच्यां ज्वाज्वल्य इतिहासामुळे आणि भिडे गुरुजींच्या सहवासामुळे आमचा दुसरा जन्म सह्याद्रीच्या पर्वंत रांगेत झाला. असा योग मिळणाऱ्या व्यक्ती फारच कमी ! गडकोटांच्या मोहिमा आवडु लागल्या. फरक जाणवला. हळूहळू लिहू लागलो. वाचु लागलो. कविता करू लागलो. आयुष्याची महती कळू लागली.
आदरणीय संभाजीराव भिडे गुरूजींचा सहवास लाभुनही आमच्या आयुष्यातुन व्यसन आणि वासना जात नव्हती .
कदाचीत आयुष्यात केलेल्या पापांमुळे, प्रारब्धांमुळे ती सुटत नसावीत. एकीकडे शिवकार्यामुळे, लेखांमुळे मला प्रचंड प्रसिद्धी मिळत गेली. आणि दुसरीकडे आमचे पाय अधिकाधीक व्यसनांकडे रुतत गेले. हा नशीबाचा भोग असावा. मी ज्या परिस्थीतीत वाढलो, शिकलो ती वेळ, तो काळ अत्यंत घाणेरडा होता .आंम्ही बदनाम राज्याचे शहंशहा झालो. दारू पिणं हि किरकोळ गोष्ट होती . गावगुंडाड, भांडणखोर, लफडेबाज, ह्या आमच्या बिरुदावल्या ! आमची गाडी त्यांच्यां ही पुढे धावु लागली. गुटखा, तंबाखु, सिगारेट, चरस, गांजा, अफू , भांग, यांसारखे अनेक शौक शरीराला चिटकले .यांसारखे अनेक व्यसनं करत असताना सुध्दा, गुरूजींच्या प्रभावशाली विचारांमुळे आमचं मन नेहमी सह्याद्रीकडे , इतिहासाकडे , शिवप्रभूंच्या विचाराकडे वळायचं .
पण व्यसनं काही सुटली नाही . गडकिल्यांवर फिरताना , त्यांच दर्शन घेताना खुपचं भारी वाटायचं . श्रीशिवाजी आणि संभाजी ही केवळ नावे नाहीत . ही संजीवनमंत्राची , महाबीजं आहेत !
अनेक वेळा प्रयत्न केला पण माझी कर्म मला पुन्हा बिअरबार कड वळवायची. संसाराची दैना उडाली . लाखो रुपये उडविले . दारू पिणारी माणसं वाईट असतात असं मला मुळीच म्हणायचं नाही ... पण व्यसनं ह्या पायातील बेडया आहेत हे नेहमी जाणवायचं . पण यातुन रस्ता सापडत नव्हता ! दोन बिअर पिल्याशिवाय कधीच झोपलो नाही . आज सुधारतो मग सुधारतो म्हणून बायकोला पंधरा वर्ष फसवलं . ति बिचारी गरीब गाय होती . अंत्यत संस्कारी . व्रत वैकल्य , पुजापाठ , ध्यानसाधना करणारी ! आणि मी नशेत उकिरडे हुंगत फिरणारा कुत्रा !
बायको केवळ मी करत असलेल्या गुरुजींच्या कार्यावर समाधानी असायची . तिने आतापर्यंत दोनवेळा गुरुजींची भेट घेवुन माझी तक्रार देखील केली ... पण अफसोस ..........पालथ्या घडयावर पाणी . पण अश्याही परिस्थीतीत तिने मला सांभाळलं ! इतरांना प्रेरणा देणारा मी , लेख लिखणारा मी, कविता करणारा मी, का सुधरत नाही हे एक मोठ कोडचं होत .समोर सगळी लोक मला प्रचंड आदर दयायची, सन्मान दयायची. नंतर पाठीमागे नावे ठेवायची. हे असचं चालू होत .... म्हणजे मला काही घंटा फरक पडायचा नाही. संसारातल दोघांपैकी कुणीतरी आता मरणारचं होत. शेवटची घडी आली होती. चार आठ दिवसांत स्वर्गवासी व्हायची लगबग उडाली...
आता इथून पुढचा चमत्कार बघा .....
नर्मदा मैय्या चमत्कार........
सोशल मिडिआच्या माध्यमातुन मला नर्मदा परिक्रमेची माहीती मिळाली. अनेक विडिओ, कथा वाचल्या.
नर्मदा मैय्या चमत्कारांची भुमी वाटली .
थोडासा अभ्यास करून निघायचं ठरलं .
घरात सांगितल आठ दिवसांत परत येईन .
पण मनात मात्र वेगळीचं डाळ शिजत होती .
मैय्याकडे जावुया आणि तिकडेच स्वताच काळवाटोळं करूया असा प्लॅन डोक्यात आला .
कदाचीत माझं मन , माझे विचार नर्मदा माईने ओळखले.
कुणीही नर्मदा परिक्रमा करू शकत नाही कारण जोपर्यंत माई एखाद्याला बोलावत नाही तोपर्यंत तो मनुष्यचं काय किंवा साक्षात ब्रम्हदेवही तिच्या आसपास जावु शकत नव्हताता . अस तिचं महात्म आहे ... साक्षात्कार घडलाच स्वप्नरूपी !
भविष्यात जे काही चांगल वाईट घडणार होतं ते पहायला आणि साक्षीला फक्त नर्मदामाई असणार होती.
लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी घरच्यांना खोटं बोलून निघालो . ३२०० कि मी जंगल, दऱ्या खोऱ्यात, आदिवासी भागात चालायचं म्हणजे दिव्य परिक्षाच होती. बिगर दारूपिता. मी माईवर पुर्ण विश्वास टाकून निघालो. श्री क्षेत्र ओमकारेश्वर येथून परिक्रमेला सुरुवात झाली. पहिल्याच आठवडयात पायांना फोड आले .पाय सुजले. पण माईने सगळं व्यवस्थित सांभाळल. अनेक चमत्कार दाखवले. घडवले. अनेक संत मंहाताच्या पायांच दर्शन घडलं . गरीबी आणि श्रीमंतीतला फरक कळला . अन्नाचं महत्व कळलं .... अन्नदान हे जगातलं सर्वात मोठ दानं आहे हे पटलं माझ्या मनातली खदखद तिने ओळखली . साथ दिली. साक्षात्कार दाखवले .
सलग पन्नास दिवस मी न विश्रांती चालत होतो. थकायचो , झोपायचो पुन्हा सकाळी पुन्हा नव्या निर्धाराने चालायचो. एकदाही मनं दारूकड वळलं नाही. ओमकारेश्वर , शुलपानी जंगल , गुजरात , समुद्रतट, महेश्वर , नेमावर , ग्वारीघाट , जबलपुर ,अमरकंटक , दिंडोरी , हंडिया घाट , सेठाणी घाट , होशंगाबाद , पार करत करत परिक्रमा पुर्ण झाली .
परिक्रमेत मला पुर्ण वेळ मिळाला स्वताशी बोलायला. चुकलेल्या वा हुकलेल्या क्षणांची इथे गोळाबेरीज करता आली . मानसाने प्रथम स्वताशी बोलावे . यातुनच आयुष्यांच कोड उलगडत गेलं !
या वाटेवर मला माझा स्वर्गवासी बाप देखील भेटला .
त्यांची माफी मागितली . परिक्रमेत असताना मी २७ प्रकारच्या बिडयांच्या ब्रँड चा आस्वाद घेतला .. खोटं बोलणार नाही . खोट बोलायच नाही . कारण नर्मदा मैय्या ज्वलंत आहे .
माझ्या सारख्या दलिंदर , पापी माणसा कडून परिक्रमा पुर्ण करुन घेणं हे सगळं माईचा आशीर्वाद होता .
परिक्रमा पुर्ण करण्यासाठी माणसाच्या अंगी दैवीशक्ती , वा वाडवडिलांची , वा त्यांच्या पितरांची जबरदस्त पुण्याई असावी लागते . नामस्मरण असावं लागतं !
वाटेत मला माझ्या बापाने कमवलेलं पुण्य आठवलं .
त्याच जोरावर मी चाललो .
पापांच्या कर्मरूपाने अनेक अडथळे निर्माण झाले .
त्यावर मात करत मी चालत राहिलो ..
पाप पुण्याचा फेरा कुणालाच सहसा सुटत नाही .
तो भोगावाच लागतो ... मी भोगला ..
आयुष्याचा फ्लॅशबॅक डोळ्यांसमोर उभा राहिला .
आताशी मला उमगल की .... माझी व्यसनं का सुटत नव्हती .
घरी जायची अजिबात तयारी नव्हती . इकडेच कुठेतरी आयुष्याचा शेवट करू असच ठरवलेलं .
नको ती नातीगोती ...
नको ती मोह माया ....
पण बायकोच्या व्रत वैकल्यामुळे , तिच्या अध्यात्मीक पॉवरमुळे , तिच्या पुजापाठ मुळे मला घरचा मार्ग सापडला असावा ....
घरी पोहचलो ...
माझं स्वागत करायला सगळ गावं , पै पाहुणे , मित्रमंडळी
हजर होती . स्वागत सोहळा नेत्रदिपक झाला ..
आता खरा चमत्कार अजुन घडायचा बाकी होता .
माझ्या घराशी अनेक वर्षा पासुन नातेसंबंध तोडणारी माणसं आज मला हार घालत होती .
माझ्याकडे वाईट नजरेने पाहणारी लोकं , आज माझ्या पाया पडत होती .
मला नेहमी दुषणं देणारी लोक आज माझ्यासोबत फोटो काढत होती .
मला वाटेत पाहून , रस्ता बदलणारी लोकं ,आज माझ्या घराच्या वाटेवर माझ्या स्वागताला उभी होती ...
पण याच लोंकामूळे मला दिशा सापडली .
नर्मदा माईचा अथांग सागर सापडला .
हा सगळा नर्मदा माईचा चमत्कार बरं ....
मुळात लोकं वाईट नव्हंतीच . वाईट होते ते माझे विचार , माझे सुविचार , माझा देह , माझे मनं !
माईने ते सगळ व्यवस्थित करून मला घरी पाठवलं .
तिस वर्षात घालवलेली इज्जत या नर्मदा माईने तिन महिन्यात पुन्हा मिळवुन दिली .
विविध आरोपांनी रंगलेला माझा देह आज माईने स्वच्छ करून घेतला होता .
तिस वर्षात केलेल्या पापां पासुन मुक्ती करून तिने पाठवले .
गावगुंड , बेवडे , टुकार ह्या पदव्या पुसुन मला वारकरी धारकरी आणि परिक्रमावासी अश्या नविन बढत्या दिल्या .
खरचं तिन महिन्यात एवढा बदल स्वतात होणं वा समाजाच्या दृष्ठीत होणं हा चमत्कार चं होता .
घरी आल्यावर कळल नर्मदा माईच रहस्य कळाल तिच प्रेम कळाल .
तिची भक्ती कळली . तिचं महात्म कळालं .
तिचा चमत्कार कळाला .
माणसातुन उठलेल्या या मोहन सातव ला पुन्हा माणसांत बसवल .तिरडीवर जायच्या माणसाला तिने मंदीरात नेलं .
पुजापाठ करायला लावला . विचार करायला भाग पाडलं . शेकडो शिवलिंगाच दर्शन घडवलं !
आयुष्याला लागलेले काळे डाग पुसून , हातात पुन्हा कोरी पाटी सजवुन दिली ..
काय हा चमत्कार ...... केवढी मोठी तिची लिला !
खर आहे..... देव सर्वाना एक मौका देतोच .
नर्मदा परिक्रमेच्या रूपात आता माझा तिसरा जन्म झालाय . पुन्हा नव्याने सुरुवात ....
मग आपली कर्म , आपली प्रारब्ध , आपली पापं , आपल पुण्य यांच खेळ सुरू होतो .
पण यात विजय नेहमी पुण्याईचा होतो ...
मग आता व्यसनं सोडणं प्रथम कर्तव्यच होत .
सोडल .......
होईन थोडासा त्रास सहन करू .....
माईच नामस्मरण करू ..... पुन्हा एकदा नव्याने आयुष्याची सुरुवात करू !
या परिक्रमेत एका धारकऱ्याने मोलाची , प्रेमाची , साथ दिली ... नाव योग्य वेळ आल्यावर सांगेन .
ही त्याचीच अट आहे ...
थोडस मनं हलकं झाल्यावर नर्मदा माईला मी प्रश्न विचारला ....
"हे मैय्या .... तु माझ्या सारख्या महागांडु प्राण्याला का परिक्रमेला बोलावल ?...का ती पुर्ण करून घेतली ?.....
का मला तु चमत्कार दाखवले ? .... का अनेक संत महतांच दर्शन घड़वल ? का पुन्हा मला चांगल्या माणसांत बसवलं ? का हा मानसन्मान मिळवुन दिला ?"
मैय्या साक्षात माझ्या सोबत बोलली ......
"अरे खुळ्या .....तु कोण ? कुठला ? तुझा माझा संबध नव्हताच मुळी !
पण तुझ्याकडे असलेल्या त्या भिडे गुरुजींचा आशिर्वादामुळे मला हे सर्व करावे लागले .
त्या देवताचा शब्द कदाचीत मीही कधीच टाळू शकत नाही . ते स्वंयभु आहेत . ते सिद्ध आहेत . तपस्वी आहे .
आता वाट चुकू नको रे लेकरा ..... जा मार्गस्थ हो !
पुढची वाटं पकड . डोळे मिट आणि त्यांच दर्शन घे ....."
मी डोळे मिटले ... समोर फक्त भिडे गुरुजीचं दिसले ..
गुरूजींच्या मागे भगवान श्रीकृष्ण दिसले .
माझ्या डोळयांतुन घळाघळा पाणी कोसळले ...
काही सेकंद भोवळ आली . छातीचे ठोके वाढले .
यावेळी एकच वाक्य आठवलं .
चिंता करितो विश्वाची ...
चिंता करितो विश्वाची ....
अजुन खुप लिहायच आहे.. पण हाथ थरथर कापतोय !
✍️निशब्ध
मोहनराव सातव ( पुणे )
गुरुजींचा धारकरी असाच घडत असतो....!
उत्तर द्याहटवाएक म्हण आहे कळतंय पण वळत नाही...!
कदाचित याचमुळे तुमच्यात अनेक कलागुण असतानाही तुम्ही व्यसनामुळे बदनाम होतात.
असो...!
मला आवडलेलं तुमचं एक वाक्य म्हणजे 'व्यसन करणारा प्रत्येकजण वाईट नसतो.' त्यामुळेच कदाचित गुरुजींनी तुम्हाला असंच स्वीकारलं असेल. आम्हाला तुमचं व्यसनाधीन वागणं अजिबात आवडत नव्हतं पण विश्वास होता की एक ना एक दिवस तुम्ही नक्की बदलाल...! तो दिवस आल्याचा अत्याधिक आनंद होत आहे.
तुमच्या सारख्या असणाऱ्या अशा अनेक धारकरयांना अशीच मुक्ती मिळल्यासाठी तुम्ही एक आदर्श आहात हे नक्की....!
खूप खूप शुभेच्छा
प्रमोद जाधव
निःशब्द....
उत्तर द्याहटवा