महर्षी व्यासांनी दिलेली संधी

आपल्या धर्म ग्रंथातून काय शिकायला हवं ....?


महाभारतात महर्षी व्यासांनी एकदा चुकलेल्या लोकांना पुन्हा दिलेली संधी....

एकदा नक्कीच वाचा.....


महर्षी व्यासांच्या महाभारतात चुकलेले ऋषी आहेत, चुकलेले राजे आहेत, चुकलेल्या स्त्रिया आहेत, चुकलेल्या माता आहेत. पण व्यासांनी एकदा चूक झाली म्हणून चुकलेल्याला कायमचा गारद ( बाद ) करून टाकले नाही. चूक करूनही प्रत्येकाला आपल्या व्यक्तीत्वाच्या वैशिष्ट्यांने विकासाची ( चूक सुधारण्याची ) संधी दिली आहे. जगात सगळेच चांगले असतं नाहीत. जे चांगले आहेत त्यांचेही सगळंच चांगलं असणे शक्य नाही. तसेच वाईट म्हणून ज्याची अपकिर्ती झालेली असते, त्यांच्यात सुध्दा चांगलेपणाचा काही भाग असतो.. 



ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर...
गुरुर द्रोणपुत्र अश्वत्थामा मारला गेला नसतानाही  'नरो वां कुंजरावो'  "अश्वत्थामा मारला गेला" हे मोठ्याने उच्चारले पण त्यानंतर पुढचं वाक्य खालच्या आवाजात म्हटलं ... "मारला गेला तो अश्वत्थामा नसून हत्ती होता " अस म्हणून असत्याचे पाप धुवून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा धर्मराज युधिष्ठिर ज्येष्ठ  पांडव पुत्र ... द्रोणांच्या मृत्यूस कारणीभूत झाला होता !



पांडवांतील  बलशाली भीम.. 
महाबली भीम त्यालाही त्याच्या ताकदीचा गर्व झालेला... आत्मविश्वास असावा पण आत्मविश्वासाला निर्बुद्ध अहंकाराचा स्पर्श होता कामा नये. रामभक्त हनुमानांनी बलवान भीमाचा गर्वहरण करून भीमाला नवी जीवन दृष्टी दिल्याचा प्रसंग महाभारतात आहे !



दानशूर कर्ण....
जेव्हा भर सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण सुरू होते तेव्हा कर्णालाही आपलं क्षत्रिय धर्म दाखवण्याची संधी होती... एका स्त्रीची अप्रतिष्ठा केली जात असताना मौन पाळून शांत बसलेल्या कर्णाला धर्माची बाजू घेण्याची संधी त्याने सोडली होती.


दुर्योधन..
भगवान श्रीकृष्ण त्याच्याजवळ येऊन जेव्हा पांडवांना त्यांच्या हक्काचे राज्य त्यांना परत कर, युद्ध नको तह कर' असे सांगितले तेव्हा दुर्योधनाला ती संधी होती...


अस्मिन् अन्तरे युधिष्ठिरार्जूनौ भीमदुर्योधनौ कर्णच्छ वसन्ति |
यस्य प्रभाव: अधिक तत्स्वभाव: भवति |
इति नित्यमहाभारत: | अस्माकं महाभारत: |

अर्थ -
आपणा सर्वांमध्ये एक युधिष्ठिर आहे, एक अर्जुन आहे, एक भीम सुध्दा आहे, एक दुर्योधन आणि एक कर्ण सुध्दा आहे,
ज्यांची मात्रा जास्त तोच स्वभाव मूळ. असे हे आपले नित्य महाभारत !

       - इति आपले महाभारत:

म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे
 'जो जे वांछील तो ते लाहो'          

चांगल्यातला वाईटपणा चांगुलपणाने ओळखून टाळता आला पाहिजे आणि वाईटातला चांगलेपणा डोळसपणे ओळखता आला पाहिजे व तितक्याच मोठ्या मनाने स्विकारता आला पाहिजे !

                - आपलं महाभारत


संकलन - बळवंतराव दळवी
               ३० मार्च २०२२

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भिडे गुरुजींचे धारकरी आणि थायलंड कनेक्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??