पोस्ट्स

श्रीशिवछत्रपती जयंती तिथीनुसार का ?

इमेज
श्रीशिवछ्त्रपती जयंती तिथीप्रमाणे का ? मला खुप कळते किवा माहिती आहे अस मी म्हणार नाही. पण नीट पहा आणि विचार करा .. छत्रपती शिवरायांची क्षमा मागून महाराष्ट्रतील तमाम हिंदूनां (यात सर्व जातीचे आले ) काही विचारायचं आहे. आपण गणेशोत्सव कधी साजरा करतो ? आपण होळी, रंगपंचमी कशी साजरी करतो ? आपण दिवाळी हा सण कधी साजरा करतो ? आपण नागपंचंमी केव्हा साजरी करतो ?  आपल्या आईबहिणी वटपौर्णिमा कधी साजऱ्‍या करतात ? आई भवानीचा नवरात्रौत्सव कधी साजरा करतो ? विजयादशमी म्हणजे दसरा कधी साजरा करतो ? ? संक्रांत – तिथीनुसार गणेश जयंती – तिथीनुसार शिवरात्र – तिथीनुसार होळी – तिथीनुसार रंगपंचमी – तिथीनुसार गुडीपाडवा – तिथीनुसार रामनवमी – तिथीनुसार हनुमान जयंती – तिथीनुसार अक्षय तृतीया – तिथीनुसार वटपौर्णिमा – तिथीनुसार आषाढी एकादशी – तिथीनुसार गुरुपौर्णिमा – तिथीनुसार नागपंचमी – तिथीनुसार रक्षाबंधन – तिथीनुसार कृष्जन्म – तिथीनुसार दहीहंडी – तिथीनुसार गणपती उत्सव – तिथीनुसार पित्र – तिथीनुसार बैलपोळा – तिथीनुसार नवरात्र – तिथीनुसार दसरा – तिथीनुसार कोजागिरी – तिथीनुसार दिवाळी – तिथीनुसार भाऊबीज – ति...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक युगाचे मनु आहेत !

इमेज
मनुस्मृती जाळणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष समोर असताना त्यांना आधुनिक युगातील मनु असे कोणी संबोधले असेल काय ? असा प्रश्न साहजिकच पडू शकतो... २५ डिसेंबर १९२७ साली महाड येथे चवदार तळ्याच्या आंदोलन वेळी हिंदू समाजातील सामाजिक विषमतेचा आधार असलेल्या मनुस्मृतीचे दहन करताना वेदीवर मनुस्मृतीचा ग्रंथ ठेवून बापूसाहेब सहस्त्रबुध्दे या ब्राह्मण  सहकारी व इतर चार पाच अस्पृश्य साधू महंत यांच्या हस्ते मनुस्मृतीचे सामूहिक दहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते हे सर्वश्रुत आहे. पुढे स्वतंत्र होणाऱ्या हिंदुस्थानचा राज्यकारभार राज्यघटनेनुसार व्हावा म्हणून प्रांतिक कायदेमंडळांनी घटना समिती तयार केली. १० डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी निवड करण्यात आली.  २१ ऑगस्ट १९४७ रोजी घटना समिती अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा संबधीत कायदेशीर गोष्टीचा विचार करण्यासाठी एक समिती ( मसुदा समिती / Drafting Committee ) नेमली त्या समितीचे सभासद डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जी. व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अ...

हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ??

इमेज
हिंदूंच्या देवदेवता नाकारणाऱ्यांना याच उत्तर देता येइल का ?? शिवकालातील तुळजाभवानी आणि एकवीरा आईचा उल्लेख                   शिवछ्त्रपतींच्या आज्ञेवरून लिहिलेल्या शिवभारत या ग्रंथातील ही काही उदाहरणे ... पौराणिकानां प्रवरं भट्टगोविन्दनंन्दनम | एकवीराप्रसादेन लब्धवाकसिध्दिवैभवम ||  अध्याय १ श्लोक क्र. ६ अर्थ -  पौराणिकांचा मुकुटमणी, एकवीरा देवीच्या कृपेने वाक्सिसिध्दिवैभव प्राप्त झालेला.  य: शास्ति वसुधामेतां राजा राजगिरीश्वर : | तुलजाया: प्रसादेन लब्धराज्यो महातपा: ||                    - अध्याय १ श्लोक क्र. ११  अर्थ - जो राजगडाचा अधिपती राजा ह्या पृथ्वीवर राज्य करित आहे, तुळजाभवानीच्या प्रसादानें ( आशीर्वादाने ) ज्याला राज्यप्राप्ती झाली आहे, जो महातपस्वी आहे.  देवद्विजगवां गोप्ता दुर्दान्तयवनान्तक: | प्रपन्नानां परित्राता प्रजानां प्रियकारक : ||                      - अध्याय १ श्लोक क्र. १५ अर्थ :-  देव ब्र...

अस्पृश्यांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या पुणे कराराची पूर्ण माहिती

इमेज
....डॉ. आंबेडकरांच्या बौध्दिक लढ्याचे फळ म्हणून   ब्रिटीश सरकारच्या जातीय निवाड्याने   अस्पृश्यांना जीवनरक्षक 'राजकिय हक्क' दिले होते. परंतु....... पुणे करार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी   शीतयुद्धाची खरी सुरुवात    लेख थोडा विस्तृत आहे. पण विषय संपूर्ण समजून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचवा ही विनंती आहे...  अस्पृश्यांचा महान नेता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांच्या उद्धारासाठी अस्पृश्यांना राजकिय हक्क मिळणे अतिशय महत्वाचे आहे असा पक्का विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा झाला होता. त्यासाठी ब्रिटिश सरकारकडून हे हक्क मिळवायचेच असा त्यांचा निश्चय झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या कामटी भागात अस्पृश्यांची पहिली राजकिय परिषद ८-९ ऑगस्ट १९३० रोजी भरविली. बाबासाहेबांनी आपल्या भाषणातून अस्पृश्यांना आपला उद्धार कसा करून घ्यावा आणि त्यासाठी काय करावे लागेल याचे मार्गदर्शन केले. याच काळात ब्रिटिश सरकार हिंदुस्थानातील वसाहतीच्या स्वराज्याचा राज्यकारभार ( ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य ) देण्याचा विचारात होते. या राज्यघटनेत अस्पृश्यांनाही...

जयपूर येथील प्रसिध्द जंतर मंतर आणि महाराष्ट्र संबंध

इमेज
Jaipur डायरी - बळवंतराव दळवी मध्यंतरीच्या काळात माझं जयपूरला जाणं झालं. तिथले आमेर पॅलेस, जयगड फोर्ट, हवामहल, जलमहल, म्युझियम अशी अनेक ठिकाणं पाहिली, पण यापैकी अनेक ठिकाणं ही फक्त खास राण्यांसाठी बांधली होती हे समजल्यावर मला जयपूर मधील एकच ठिकाण आवडलं.... 'जंतर मंतर'  खर तर इथे कोणतेही मंत्र वैगेरे नाही तर इथे अनेक यंत्र आहेत. याला यंत्र  वेधशाळा या शब्द योग्य. पण उत्तर भारतात 'य' चा उल्लेख 'ज' केला जातो जसे आपल्याकडे जाधव पण तिथे यादव. तसेच यंत्रच्या जागी जंत्र त्याचाच पुढे जंतर झालं ! पहिल्यांदा गेलो तेव्हा इथले अनेक यंत्र पाहिले... हे यंत्र वेळ, काळ, राशी, नाडी अशावर सूर्याचा होणारा प्रभाव दर्शविणारी आहेत. हे यंत्र समजून घेण्याचा प्रयत्न केला काही यंत्र नाही समजले. ठरवून दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहायला गेलो. यावेळी अभ्यासून ते यंत्र पाहिले. व्हिडिओ काढले ते लवकरच माझ्या YouTube चॅनल वर टाकणार आहेच. जयपूर मधील गाईड त्यांच्या राजाबद्दल खूप भरभरून बोलले... पण आम्हाला जयपूर फिरवणाऱ्या ड्राइव्हरने सांगितलं ते ऐकून आपल्या महाराष्ट्रातील गडक...

गडावर भेटणारा तो अनोळखी गडी

इमेज
आपल्याला कुठे जायचे आहे. कुठल्या मार्गाने जायचे आहे. यांचे आणि आपले नाते नक्की कधी जुळले ? काय आहे हे नातं ? कोण आहेत की निष्ठावंत साथ देणारी आणि तुमच्याकडून काहीच अपेक्षा न ठेवणारी  ? गडाचा सगळा घेरा, त्यांच्या वाटा सर्व काही यांना आधीच ठाऊक असल्यासारखं, गडावरील प्रत्येक ठिकाण यांना ठाऊक असते. कोण असतात ही.....                गडावर भेटणारा तो अनोळखी गडी           --------------------------------------                                          - बळवंतराव दळवी ओळख नाही पाळख नाही न त्याला आपण स्वतःहून गडकिल्ल्यावर जातानाचा संदेश दिला असतो. पण जणू आपण गडावर येणार हे त्याला आधीच कोणी सांगितलेलं !  कधी तो फार पुढे तर कधी वाट बघत दुरुन आपल्याकडे लक्ष ठेवू असतो. आपण थोडा विसावा घेतो. तो लगेच आपल्या जवळ येतो. आपल्याकडे पाहतो. जणू म्हणत असतो,  "चाला बिगीन बिगीन लैय चढ हाय अजून." तो पुढे असल्याने आपल्याल...

महर्षी व्यासांनी दिलेली संधी

इमेज
आपल्या धर्म ग्रंथातून काय शिकायला हवं ....? महाभारतात महर्षी व्यासांनी एकदा चुकलेल्या लोकांना पुन्हा दिलेली संधी.... एकदा नक्कीच वाचा..... महर्षी व्यासांच्या महाभारतात चुकलेले ऋषी आहेत, चुकलेले राजे आहेत, चुकलेल्या स्त्रिया आहेत, चुकलेल्या माता आहेत. पण व्यासांनी एकदा चूक झाली म्हणून चुकलेल्याला कायमचा गारद ( बाद ) करून टाकले नाही. चूक करूनही प्रत्येकाला आपल्या व्यक्तीत्वाच्या वैशिष्ट्यांने विकासाची ( चूक सुधारण्याची ) संधी दिली आहे. जगात सगळेच चांगले असतं नाहीत. जे चांगले आहेत त्यांचेही सगळंच चांगलं असणे शक्य नाही. तसेच वाईट म्हणून ज्याची अपकिर्ती झालेली असते, त्यांच्यात सुध्दा चांगलेपणाचा काही भाग असतो..  ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर... गुरुर द्रोणपुत्र अश्वत्थामा मारला गेला नसतानाही  'नरो वां कुंजरावो'  "अश्वत्थामा मारला गेला" हे मोठ्याने उच्चारले पण त्यानंतर पुढचं वाक्य खालच्या आवाजात म्हटलं ... "मारला गेला तो अश्वत्थामा नसून हत्ती होता " अस म्हणून असत्याचे पाप धुवून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा धर्मराज युधिष्ठिर ज्येष्ठ  पांडव पुत्र ... द्रोणांच्या मृत...