तांडव सिरिज आणि हिंदूचा उशीरा जागे होण्याचा प्रकार

तांडव सिरिज आणि हिंदूचा उशीरा जागे होण्याचा प्रकार तत्पर धारकऱ्यांनी केलेली कृती..... २४ फेब्रुवारी २०१७ रोजी मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांच्या मोबाईलवर एक छोटी पोस्ट आली होती. आणि ती वाचून त्याबद्दल पुर्ण शहानिशा केल्यावर दुसऱ्याच दिवशी दि. २५ फेब्रुवारी २०१७ शनिवारचा दिवस होता ... मुंबईतील आदरणीय भिडे गुरुजींचे धारकरी विलेपार्लेस्थीत Colours मराठी चॅनलच्या कार्यालयात धडकले होते. याला कारण होते .. हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचा ( भविष्यात म्हणजे दोन दिवसांनंतर म्हणजेच २७ - २८ फेब्रुवारी २०१७ रोजी कलर्स मराठीच्या चॅनलवर ) होणारा अवमान रोखण्यासाठी ...! कलर्स मराठी चॅनलच्या Too 2 Mad या कार्यक्रमात छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा असा अफजल वध विषयावर नृत्य प्रसारित होणार होते ... हा प्रसंग जसा घडला तसा दाखवला असता तर शिवभक्तांना आनंदच होणार होता .. परंतु.... हे दाखवताना शिवछत्रपती - अफजलखान यांचे एकत्रित नृत्य ( डांस- ) दाखवून कलर्स चॅनल शिवछत्रपतींचा अवमान करत होते .... शिवछत्रपती आणि अ...