...... आणि शिवभक्त धावून आले !

महिलेच्या फोटोवर आक्षेपार्ह लिखाण करून फेसबुकवर व्हायरल करणाऱ्या व्यक्ती विरोधात FIR दाखल प्रतिनिधी - मुंबईत मालाड येथे राहणाऱ्या एका विवाहीत महिलेचे फोटो Edit करून तिला बदनाम करण्याच्या उद्देशाने फेसबुकवरील गृपवर एका विक्षिप्त तरुणाने ते फोटो फेसबुकवर व्हायरल केल्याची घटना घडली. उपलब्ध माहितीनुसार 'तेरा दिवाना' असे नाव धारण करणाऱ्या त्या विक्षिप्त तरुणाने अनामिका ( नाव बदललेले आहे ) या महिलेने साईबाबांचा फोटो फेसबुकवरील एका गृपवर टाकला होता. त्यावर अनेकांनी कमेंट करताना 'ॐ साई राम , जय साई राम' असे लिहिलेले असताना त्या विक्षिप्त तरुणाने सदर महिलेशी अश्लील भाषेत बोलणे सुरु केले. त्यावर त्या महिलेने त्या तरुणाला त्याबाबत जाब विचारला असता त्या तरुणांने त्या महिलेला मेसेज करून अश्लील संभाषण सुरु केले आणि तीचे फेसबुकवरील फोटो डाउनलोड करून त्यावर अश्लील लिखाण करून ते पसरवण्याची धमकी देउन त्याने ते फोटो फेसबुकवरील गृपवर प्रसिद्ध केले. त्या महिलेने ही गोष्ट सांगलीतील श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांना सांगितली. ती महिला मुंबई येथे राहात असल्याने शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यां...