शेकडो पाकिस्तानी आणि खलिस्तानवाद्यांना नडला एकटा भारतीय

जर्मनीत भारताविरोधात आणि खलिस्तानच्या मागणीसाठी पाकिस्तानी आणि खलिस्तानवाद्यांनी शेकडोंच्या संख्येंने एकत्र येउन मोर्चा काढला होता. पण या मोर्चाला हाती तिरंगा घेउन एक भारतीय नडला. काश्मीरच्या मुद्यावर जगसमोर तोंडावर आपटल्यानंतर आता पाकिस्तानकडून खलिस्तानवादी आंदोलकांना पाठबळ देण्याचे पुन्हा प्रयत्न सुरु आहेत. परदेशातील पाकिस्तानी नागरीक खलिस्तानीवाद्यांना पाठिंबा देण्यासाठी जर्मनीत १५ ऑगस्ट रोजी खलिस्तानसाठी रॅली काढली होती. या मोर्चाला प्रशांत वेंगुर्लेकर या भारतीयाने एकट्याने सामोरे जाताना आपल्या हाती भारताचा तिरंगा घेऊन "बाप बाप होता है" अशी अभिमानाने प्रतिउत्तर देणारा त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारताला विरोध दर्शविण्यासाठी शेकडोंच्या संख्येने मोर्चेकरी तिथे असताना प्रशांत वेंगुर्लेकर हा भारतीय मोर्चा जात असलेल्या रस्त्यावर एकटा उभा राहून 'भारत माता की जय, सारे जहां से अच्छा हिंदोस्ताँ हमारा' सारख्या घोषणा देत उभा होता. या घोषणांमुळे काही मोर्चेकरी त्याच्या अंगावरही धावून गेले. काही मोर्चेकऱ्यांनी घेराव करण्याचा, हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित...