न विसरता येणारा 'अभ्यास' ...
इयत्ता ४ थीत असताना पहिल्यांदाच शिवाजी महाराजांची गाठ पडली.... पहिल्याच पानावर राजे घोड्यावर बसलेले आणि सोबत मावळे असे चित्र आजही आठवते. इतिहासाचे संपुर्ण पुस्तकच महाराजांचा पराक्रम सांगत होतं. शौर्य, धैर्य, बुध्दिमत्ता, चातुर्य, लढाऊपणा, सर्व काही अगदी एखाद्या दैवी कथेप्रमाणे पानापानावर ओसंडून वाहत होतं. शिवरायांचे बालपण, शिवनेरी किल्ल्यावरील राजांचे जन्मस्थानाचा फोटो, रायरेश्वर मंदिरात बेलपत्र वाहून बालशिवबाने घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पाहताना आपल्यालाही मावळा वाहयाचं होतं ते चित्र आठवते का ? अफजलखानाने हात पसरुन राजांना दिलेलं आलिंगन आणि राजांनी काढलेला कोथळा हे वाचताना त्या बालवयातही हाताच्या मुठ्या आवळल्या जायच्या. आग्र्याच्या दरबारातील तो प्रसंग बादशहाच्या हातावर तुरी दिल्या, हे शिवरायांनी आम्हाला जगावं कसं हे शिकवलं. गड आला पण सिंह गेला हा धडा वाचत असताना तानाजीसाठी शिवरायांना हळहळताना वाचून डोळ्यांच्या पापण्या ओल्या वाहायच्या ....... त्या वयातच शिवराय मनात घर करुन राहिले. आजही माझ्या ऐतिहासिक पुस्तकांच्या...