डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं
आजपासून १०२ वर्षापूर्वी १९१७ ला कॉग्रेस पक्ष आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार झाला. या करारात मुसलमानांना जास्तीतजास्त हक्कांच्या सवलती देउन त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी कॉंग्रेस पक्षाने मान्य केली होती. " भाषावार प्रांतरचनेचे तत्व स्विकारून बंगाल, पंजाब, सिंध, बलुचिस्तान व वायव्य सरहद्द प्रांत हे मुसलमान बहुसंख्याक होतील आणि त्या प्रांतात राहणारे हिंदू हे अल्पसंख्याक होतील आणि ते तिथे सुरक्षित राहू शकणार नाही. त्यांच्यावर अत्याचार होतील. अशा प्रकारची प्रांत रचना हिंदुस्थानच्या दृष्टीने धोकादायक आहे. असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले होते. कारण हिंदुस्थानात हिंदू आणि मुसलमान हे दोन समाज राहत नसून दोन भिन्न संस्कृतीची राष्ट्रे नांदत आहेत" असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. "हिंदुस्थानाच्या एका बाजुला चीन आणि जपान ही राष्ट्रे तर दुसऱ्या बाजुला अफगाणिस्तान अशी मुस्लिम राष्ट्र आहे. भविष्यात जर चीन किंवा जपानने हिंदुस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर देशाच्या रक्षणासाठी हिंदू - मुसलमान एकजुटीने प्रतिकार करतील ..... पण .... पण जर अफगाणिस्तानने...