पोस्ट्स

history लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता ?' या पुस्तकाची दूसरी बाजू

इमेज
म. फुले इतिहाससंशोधक नव्हते किंवा इतिहासकार नव्हते. समतेचा पुरस्कार व प्रचार करणारे कर्ते सुधारक म्हणून त्यांनी शिवाजीस असे म्हटले असेल म्हणून त्यांचा पोवाड्याचा आधार दूर करता येणे शक्य आहे ." (पान क्र. ५०) शिवाजी कोण होता ? या पुस्तकात स्व. गोविंद पानसरे लिहितात... --------------------------------------------------------                          ● शिवाजी आणि धर्म - "शिवाजी हिन्दू होता. शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला व त्याची कर्मभुमीही महाराष्ट्रच होती. यामुळे हिंदूंना शिवाजीसंबंधी अभिमान वाटतो. त्यातल्यात्यात महाराष्ट्रीय हिंदूंना जरा जास्तच अभिमान वाटतो.  (पान क्र. २३) ● देवळांची लुट, मोड़तोड इत्यादि - मुस्लीम संघटनांचे त्याच्या अनुयायांना प्रतिपादन असते की,हिंदू धर्म म्हणजे काफरांचा धर्म. आपल्या पूर्वजांनी तो बुडवण्यासाठी प्रयत्न केले ते बरोबरच केले. जमले तर आपणही तसेच करावे. निदान हिंदूंविरुध्द आपणअसावे" असा त्यांचा प्रचार असतो व आहे . आपण राज्यकर्ते (होतो) परंतु राज्यकर्ते म्हणून आपले महत्व नाही ही खंत आणि त्य...

श्रीराम मंदिराचा मनाचा मोठेपणा दिसावा

इमेज
किमान ५०० - ५५० वर्षाचा इतिहास पुन्हा बदलला जाणार आहे. याधी हा इतिहास गुजरातच्या सोरटी सोमनाथ या मंदिराबाबत घडला आहे. हिंदुस्थानाला लुटायला आलेला गझनीचा मुहम्मद याने सोमनाथचे मंदिर तोडून फोडून टाकले होते ते मंदिर पुनच्छ स्वतंत्र हिंदुस्थानात सरदार वल्लभभाई पटेल यांनी  पंडित जवाहरलाल नेहरु यांची पर्वा न करता त्याच दिमाखात ते मंदिर उभं केल्याचा इतिहास आहे ........ असाच एक लुटारू बाबरने श्रीरामांचे जन्मस्थान उध्द्वस्त करून त्या ठिकाणी मस्जिद उभारली. दुर्दैवाने इतिहासात ती मस्जिद पुन्हा पाडून श्रीरामांचे मंदिर उभं करण्याच सामर्थ्य तेव्हा कोणातही नव्हतं.. ६ डिसेंबर १९९२ रोजी हजारों श्रीराम भक्त कारसेवकांनी बाबरी मस्जिद उध्वस्त केली आणि संपूर्ण भारतात त्यानंतर हिंदू - मुस्लिम दंगल उसळल्या. या दंगलीची सर्वात जास्त झळ बसली ती मुंबईला. ६ डिसेंबरला सुरु झालेले युध्द १२ मार्च १९९३ च्या मुंबई बॉंबस्फोटापर्यंत सुरुच होत. त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थान शांत होता पण मुंबई मात्र जळत होती....  मुंबई दंगलीत शेकडो हजारो लोकं मृत्यूमुखी पडली होती. बॉंबस्फोटाने हादरुन गेलेल्या मुंबईने श्रीराम मंदिरास...

न विसरता येणारा 'अभ्यास' ...

इमेज
इयत्ता ४ थीत असताना पहिल्यांदाच शिवाजी महाराजांची गाठ पडली....  पहिल्याच पानावर राजे घोड्यावर बसलेले आणि सोबत मावळे असे चित्र आजही आठवते. इतिहासाचे संपुर्ण पुस्तकच महाराजांचा पराक्रम सांगत होतं. शौर्य, धैर्य, बुध्दिमत्ता, चातुर्य, लढाऊपणा, सर्व काही अगदी एखाद्या दैवी कथेप्रमाणे पानापानावर ओसंडून वाहत होतं. शिवरायांचे बालपण, शिवनेरी किल्ल्यावरील राजांचे जन्मस्थानाचा फोटो, रायरेश्वर मंदिरात बेलपत्र वाहून बालशिवबाने घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पाहताना आपल्यालाही मावळा वाहयाचं होतं ते चित्र आठवते का ? अफजलखानाने हात पसरुन राजांना दिलेलं आलिंगन आणि राजांनी काढलेला कोथळा हे वाचताना त्या बालवयातही हाताच्या मुठ्या आवळल्या जायच्या. आग्र्याच्या दरबारातील तो प्रसंग बादशहाच्या हातावर तुरी दिल्या, हे शिवरायांनी आम्हाला जगावं कसं हे शिकवलं.  गड आला पण सिंह गेला हा धडा वाचत असताना तानाजीसाठी शिवरायांना हळहळताना वाचून डोळ्यांच्या पापण्या ओल्या वाहायच्या ....... त्या वयातच शिवराय मनात घर करुन राहिले. आजही माझ्या ऐतिहासिक पुस्तकांच्या...