श्रीराम मंदिराचा मनाचा मोठेपणा दिसावा
किमान ५०० - ५५० वर्षाचा इतिहास पुन्हा बदलला जाणार आहे. याधी हा इतिहास गुजरातच्या सोरटी सोमनाथ या मंदिराबाबत घडला आहे. हिंदुस्थानाला लुटायला आलेला गझनीचा मुहम्मद याने सोमनाथचे मंदिर तोडून फोडून टाकले होते ते मंदिर पुनच्छ स्वतंत्र हिंदुस्थानात सरदार वल्लभभाई पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांची पर्वा न करता त्याच दिमाखात ते मंदिर उभं केल्याचा इतिहास आहे ........ असाच एक लुटारू बाबरने श्रीरामांचे जन्मस्थान उध्द्वस्त करून त्या ठिकाणी मस्जिद उभारली. दुर्दैवाने इतिहासात ती मस्जिद पुन्हा पाडून श्रीरामांचे मंदिर उभं करण्याच सामर्थ्य तेव्हा कोणातही नव्हतं.. ६ डिसेंबर १९९२ रोजी हजारों श्रीराम भक्त कारसेवकांनी बाबरी मस्जिद उध्वस्त केली आणि संपूर्ण भारतात त्यानंतर हिंदू - मुस्लिम दंगल उसळल्या. या दंगलीची सर्वात जास्त झळ बसली ती मुंबईला. ६ डिसेंबरला सुरु झालेले युध्द १२ मार्च १९९३ च्या मुंबई बॉंबस्फोटापर्यंत सुरुच होत. त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थान शांत होता पण मुंबई मात्र जळत होती.... मुंबई दंगलीत शेकडो हजारो लोकं मृत्यूमुखी पडली होती. बॉंबस्फोटाने हादरुन गेलेल्या मुंबईने श्रीराम मंदिरास...