रायगडावरील 'त्या' तिकीट घराला शिवभक्तांनी दाखवले टकमक टोक
आणि अशा तऱ्हेने शिवभक्तांचा राग अनावर झाला ... काही दिवसांपुर्वी रायगडावर प्रीवेडींग शूटची घटना उघड करताना पुरातत्व विभागाचा गोंधळ कारभार बाहेर आला आणि त्या वेळी शिवभक्त धारकरी आणि श्रीछत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव समितीचे पदाधिकारी श्री. सिध्देश सुर्वे यांनी पुरातत्व विभागाला जाब विचारला होता, 'रायगडावर जाण्याकरता २५ रुपये प्रवेश शुल्क घेतले जात होते, गडावर पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नाही, स्वच्छता गृहांची व्यवस्था नाही मग हे पैस का आणि कशा करता ?' या मागणीकडे शिवसेनेचे आमदार आमदार मा. श्री. भरतशेठ गोगावले यांनी लक्ष देवुन आज चित्तदरवाजापाशी असणाऱ्या त्या तिकीटघराला उखडून दरीत फेकुन देत यापुढे असा कोणतेच तिकीट शिवभक्तांकडून आकारु नये अशी सख्त ताकीद पुरातत्व खात्याला दिली. तसेच महाराष्ट्रातील सगळ्या शिवभक्तांचे होणारे हाल लक्षात घेऊन गडावरील वेळ मर्यादा हटवुन किल्ले रायगड हा शिवभक्तांसाठी वर्षाचे १२ महीने २४ तास खुला असावा अशा मागणीला सुद्दा आमदार साहेबांनी सहमती देत गडावर राहण्याच्या बंदीचा नियम लवकरच हटवन्याची मागणी केली आहे. ...