रायगडावरील 'त्या' तिकीट घराला शिवभक्तांनी दाखवले टकमक टोक
आणि अशा तऱ्हेने शिवभक्तांचा राग अनावर झाला ...
काही दिवसांपुर्वी रायगडावर प्रीवेडींग शूटची घटना उघड करताना पुरातत्व विभागाचा गोंधळ कारभार बाहेर आला आणि त्या वेळी शिवभक्त धारकरी आणि श्रीछत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव समितीचे पदाधिकारी श्री. सिध्देश सुर्वे यांनी पुरातत्व विभागाला जाब विचारला होता, 'रायगडावर जाण्याकरता २५ रुपये प्रवेश शुल्क घेतले जात होते, गडावर पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नाही, स्वच्छता गृहांची व्यवस्था नाही मग हे पैस का आणि कशा करता ?'
या मागणीकडे शिवसेनेचे आमदार आमदार मा. श्री. भरतशेठ गोगावले यांनी लक्ष देवुन आज चित्तदरवाजापाशी असणाऱ्या त्या तिकीटघराला उखडून दरीत फेकुन देत यापुढे असा कोणतेच तिकीट शिवभक्तांकडून आकारु नये अशी सख्त ताकीद पुरातत्व खात्याला दिली. तसेच महाराष्ट्रातील सगळ्या शिवभक्तांचे होणारे हाल लक्षात घेऊन गडावरील वेळ मर्यादा हटवुन किल्ले रायगड हा शिवभक्तांसाठी वर्षाचे १२ महीने २४ तास खुला असावा अशा मागणीला सुद्दा आमदार साहेबांनी सहमती देत गडावर राहण्याच्या बंदीचा नियम लवकरच हटवन्याची मागणी केली आहे.
गडावर कोणते कार्य करायचे असल्यास त्यांच्याकडून पुरातत्त्व विभाग दिवसाचे २५ हजार आणि सिक्योरिटी डिपॉजिट ३० हजार या प्रमाणे पैसे आकारतात असा आरोप स्थानिकांकडून झाल्यानंतर या गोष्टी त्वरित बंद व्हाव्यात म्हणून देखील या वेळी समिती तर्फे मागणी करण्यात आली.
तसेच नित्यपुजेसाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सांगलीहुन येणार्या धारकऱ्यांना सुद्धा गडावर यापुढे कोणतीच अडचण येता कामा नये अशी सख्त ताकिद यावेळी आमदार भरत गोगावलेंनी पुरातत्व विभागाला दिली !
प्रिवेडिंग शुटचे प्रकरण बाहेर काढणारे महाड मधील शिवभक्त धारकरी आणि श्रीछत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे पदाधिकारी श्री. सिद्धेशराव सुर्वे यांचे शिवभक्तांकडून आभार मानले जात आहे सोबतच महाड मधील शिवभक्त, शिवसैनिक सुरेश पवार, प्रभाकर सावंत, सुभाष मोरे, रघुवीर देशमुख, सिध्देश पाटेकर आणि प्रत्येक वेळी शिवकार्यासाठी तत्परतेने धाऊन येणारे शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांचेही विशेष आभार उपस्थित शिवभक्तांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा