पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मिळालेली संधी - कथा व बोध

इमेज
आटपाट नगरातील एका गावात एक पुरातन मंदिर होतं. त्या मंदिराचा वयोवृद्ध पुजारी तो करत असलेल्या धर्मकार्याबद्दल आजूबाजूच्या अनेक गावात प्रसिद्ध होता. पुजाऱ्याची देवावर अपार श्रद्धा भक्ती होती. गावातील लोकं त्या पुजाऱ्यांना खूप मानत... गावात काही अडिअडचण आली की पुजाऱ्याने सांगितलेले उपाय करून संकट दुर करण्यासाठी प्रयत्न केले जात. अशाच एका पावसाळ्यात गावाशेजारील नदीला अचानक पूर आला. नदीचे पाणी गावात शिरायला लागले. लोकं आपआपले सामान वाचवण्यासाठी धडपड करु लागले. पाणी वाढत गेले. पुर्ण गाव पाण्याखाली जाणार अशी भिती वाटू लागली. गावातील काही लोकं मंदिरात असणाऱ्या पुजाऱ्यांकडे पोहचली. वयोवृद्ध पुजाऱ्यांना वाढणाऱ्या पुराबद्दल गावकऱ्यांनी सांगितले... "पुजारीबाबा, मंदिरातून बाहेर पडा. पुराचे पाणी वाढायला लागले आहे." "मी हे मंदिर सोडणार नाही. माझा देव मला या संकटातून वाचवेल. तुम्ही जा !"  पुजारीने गावकऱ्यांना उद्देशून म्हटले. गावकरी नाईलाजाने परतले. पाहतापाहता पुराच्या पाण्यात मंदिराच्या पायऱ्या दिसेनाशा झाल्या. गावकऱ्यांना पुजारी बाबांची चिंता लागून होती. त्यांनी ही गोष्ट बचावकार्य...

महर्षी व्यासांनी दिलेली संधी

इमेज
आपल्या धर्म ग्रंथातून काय शिकायला हवं ....? महाभारतात महर्षी व्यासांनी एकदा चुकलेल्या लोकांना पुन्हा दिलेली संधी.... एकदा नक्कीच वाचा..... महर्षी व्यासांच्या महाभारतात चुकलेले ऋषी आहेत, चुकलेले राजे आहेत, चुकलेल्या स्त्रिया आहेत, चुकलेल्या माता आहेत. पण व्यासांनी एकदा चूक झाली म्हणून चुकलेल्याला कायमचा गारद ( बाद ) करून टाकले नाही. चूक करूनही प्रत्येकाला आपल्या व्यक्तीत्वाच्या वैशिष्ट्यांने विकासाची ( चूक सुधारण्याची ) संधी दिली आहे. जगात सगळेच चांगले असतं नाहीत. जे चांगले आहेत त्यांचेही सगळंच चांगलं असणे शक्य नाही. तसेच वाईट म्हणून ज्याची अपकिर्ती झालेली असते, त्यांच्यात सुध्दा चांगलेपणाचा काही भाग असतो..  ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर... गुरु द्रोणपुत्र अश्वत्थामा मारला गेला नसतानाही  'नरो वां कुंजरावो'  "अश्वत्थामा मारला गेला" हे मोठ्याने उच्चारले पण त्यानंतर पुढचं वाक्य खालच्या आवाजात म्हटलं ... "मारला गेला तो अश्वत्थामा नसून हत्ती होता " अस म्हणून असत्याचे पाप धुवून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा धर्मराज युधिष्ठिर ज्येष्ठ  पांडव पुत्र ... द्रोणांच्या मृत्...