पोस्ट्स

mumbai लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भिडे गुरुजींचे 'त्या' धारकऱ्याबद्दलचे 'ते' मत

इमेज
आदरणीय श्री. संभाजीराव भिडे गुरुजी हे नाव महाराष्ट्राला नविन नाही. त्यांच्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे कार्य उभ्या महाराष्ट्रात सुरु आहे. तरुणांमध्ये श्रीशिवछत्रपती - श्रीसंभाजीमहाराज रुजवण्याचे काम त्यांचे धारकरी अत्यंत तळमळीने करत असतात. या संघटनेत पद पैसा आणि प्रसिद्धी या गोष्टीना अजिबात थारा नाही. संपूर्ण वर्षभरातील त्यांचे उपक्रम ठरलेले आणि नियोजित असतात.  भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यात येउन ज्यांना अनेक वर्षे झाली असे मुंबई विभागाचे प्रमुख बळवंतराव दळवी यांनी दिलेली ही माहिती   "२०१८ ... ठाण्यातील बैठकीसाठी मुंबईतून आदरणीय गुरुजींना घेऊन मी ठाण्यात एका धारकरी बंधूच्या घरी पोहचलो.  मुंबईतून आलेल्या धारकऱ्यांनी जेवण करून घेतलं... पण गुरुजींनी "माझा आज उपवास होता तो आज सकाळीच सुटला आता मी अन्नप्राशन करणार नाही  !" असं ठामपणे म्हटले आणि एका बाजूला वर्तमानपत्र वाचत बसले. थोडा निवांत वेळ मिळताच मी गुरुजींच्या समोर बसलो... अनेक दिवसांची घालमेल त्यांच्यासमोर मांडली..... "गुरुजी, मुंबईची जबाबदारी माझ्याकडून काढून कोणा दुसऱ्याव...

श्रीराम मंदिराचा मनाचा मोठेपणा दिसावा

इमेज
किमान ५०० - ५५० वर्षाचा इतिहास पुन्हा बदलला जाणार आहे. याधी हा इतिहास गुजरातच्या सोरटी सोमनाथ या मंदिराबाबत घडला आहे. हिंदुस्थानाला लुटायला आलेला गझनीचा मुहम्मद याने सोमनाथचे मंदिर तोडून फोडून टाकले होते ते मंदिर पुनच्छ स्वतंत्र हिंदुस्थानात सरदार वल्लभभाई पटेल यांनी  पंडित जवाहरलाल नेहरु यांची पर्वा न करता त्याच दिमाखात ते मंदिर उभं केल्याचा इतिहास आहे ........ असाच एक लुटारू बाबरने श्रीरामांचे जन्मस्थान उध्द्वस्त करून त्या ठिकाणी मस्जिद उभारली. दुर्दैवाने इतिहासात ती मस्जिद पुन्हा पाडून श्रीरामांचे मंदिर उभं करण्याच सामर्थ्य तेव्हा कोणातही नव्हतं.. ६ डिसेंबर १९९२ रोजी हजारों श्रीराम भक्त कारसेवकांनी बाबरी मस्जिद उध्वस्त केली आणि संपूर्ण भारतात त्यानंतर हिंदू - मुस्लिम दंगल उसळल्या. या दंगलीची सर्वात जास्त झळ बसली ती मुंबईला. ६ डिसेंबरला सुरु झालेले युध्द १२ मार्च १९९३ च्या मुंबई बॉंबस्फोटापर्यंत सुरुच होत. त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थान शांत होता पण मुंबई मात्र जळत होती....  मुंबई दंगलीत शेकडो हजारो लोकं मृत्यूमुखी पडली होती. बॉंबस्फोटाने हादरुन गेलेल्या मुंबईने श्रीराम मंदिरास...