पोस्ट्स

maharashtra लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पॅकेजवाले पत्रकार

इमेज
आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींना नाहक बदनाम करण्यासाठी २०१६ पासून अत्यंत फालतू बोगस पत्रकारांची एक मोठी टीम मिळणाऱ्या पैशासाठी हाती आलेले पॅकेज News चालवून गुरुजींची बदनामी करत आले आहेत. अत्यंत फालतू पत्रकारिता करून स्वतःला पत्रकार म्हणवून घेणारी लोक समाजात उदयास आली आहेत. कोणत्यातरी वर्तमापत्रात टेंपररी ( घरात बसून खर्डेघाशी पत्रकारिता ) करून स्वतःला पत्रकार म्हणवून घेत ही लोक हाती आलेले पॅकेज सातत्याने पसरवून बिनधास्तपणे खोटे पसरवत असतात. उदाहणादाख ल -  १) २०१६ सालीे लोअरपरळ येथे एका शाळेच्या भल्या मोठ्या सभागृहात किमान दिड हजार शिवभक्त सलग तीन तास भिडे गुरुजींचे व्याख्यान सुरू असताना एका संघटनेत ज्यात पुरूष नसावेत म्हणून त्यांनी काही स्त्रियांना गुरुजींच्या व्याख्यानात व्यत्यय आणण्यासाठी पाठवले असताना त्यांना आम्ही अत्यंत आदराने सभागृहाबाहेर नेले असताना अवघ्या काही मिनिटांत एक बातमी काही online वर्तमानपत्रांमधून पसरवली गेली. या बातमीचा मथळा थोडा वेगळा असला तरी बातमी एकच होती. "भिडे गुरुजींना वर्गात कोंडल" 'भिडे गुरुजींना खोलीत कोंडल' अमुक संघटनेच्या लोका...

हेच तर महाराष्ट्राचे दुर्दैव....

इमेज
 कुठली फालतू कॉमेडियन पिलावळ उठसुठ देशाच्या राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक बोलून तर कधी हिंदू देवदेवतांची टिंगळ टवाळी करत विनोद करुन पैसे कमावण्यासाठी वाट्टेल ते जोक करतात. त्यांचे video सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. पण त्यांच्यावर तात्काळ कारवाई न करता महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेब असं म्हणतात की, "त्या कॉमेडियनवर कारवाई करण्याआधी कायदेशीर सल्ला घेण्यात येइल. चौकशी मध्ये जर दोषी आढळून आल्यास तर कारवाई केली जाईल !" पण .... दुसरीकडे मात्र शिवछत्रपतींच्या प्रेमापोटी शिवभक्तांनी रागाच्या भरात चुकीचे शब्द वापरुन त्या कॉमेडियनला प्रतिउत्तर दिले तर शिवभक्तांवर ताबडतोब कारवाई करण्यात आली.  पण ज्यांनी शिवछत्रपतींचा अवमान जाहिररित्या केला, ज्यांचे आक्षेपार्ह Video अजूनही Youtube वर सर्रासपणे पाहिले जात आहेत त्यांच्या वक्तव्यांची चौकशी केल्यानंतर कारवाई होणार ???  याचसाठी महाराष्ट्रात राष्ट्रवादीने शिवसाम्राज्ययात्रा काढलेली काय ? जे डोळ्यांनी दिसत आहे त्यापैकी एकावर कारवाई आणि दुसऱ्याला मात्र अजूनही मोकाट सोडून चौकशीचे आदेश ? हीच तुमची शिवछत्रपतींच्या प्रति आदरभावना ? ती अग्...

कोरेगाव भीमा लढाईच्यावेळी महार रेजिमेंटच नव्हती ? काय आहे सत्य ?

इमेज
१ जानेवारी १८१८ च्या कोरेगाव - भीमा लढाईत पेशवे किंवा इंग्रज यांच्यापैकी कुणीही ही लढाई जिंकलं अथवा हरलं नाही अशी गोप्यस्फोट करणारी माहिती इतिहास संशोधक चंद्रकांत शामराव पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी समितीपुढे बुधवारी मांडली आहे.  चंद्रकांत पाटील यांनी पुरावा म्हणून शेकडो पानांसह प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कोलकाता हायकोर्टाचे माजी सरन्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीपुढे सुनावणी सुरू आहे. कोरेगाव भीमाची लढाई बडोद्याच्या गायकवाडांचे मंत्री गंगाधर शास्त्री पटवर्धन यांची हत्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू त्रिंबकजी डेंगळे यांनी घडवल्यावरून झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. ही लढाई कुठल्याही जाती वा धर्माशी संबंधित नव्हती असे सांगतानाच पाटील यांनी प्रसारमाध्यमांमध्ये आलेली ५०० महार व पेशव्यांचे २८ हजार सैनिक यांच्यात झाल्याची माहिती संशयास्पद असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.  महार रेजिमेंटची स्थापना १९४१ साली झाली, त्यामुळे त्यांचा १८१८ च्या लढाईत सहभाग असण्याचा प्रश्नच येत नाही . असा दावा पाटील यांनी केला आहे. गेले पाच महिने आपण जयस्तंभाश...

हिंदूंची मंदिरे का तोडली जातात ? कारणे व उपाय

इमेज
मंदिरे ही हिंदूंची अस्मिता आहे आणि या अस्मितेला कोणत्याही प्रकारचा धक्का बसला की निश्चितच  आपल्याला त्याचा राग येतो. बऱ्याचदा हिंदूंच्याच चुकीमुळे अनेक वेळा प्राचीन मंदिरेही महानगरपालिका / सरकार / विकासकाकडून तोडली जातात. आपल्या शेजारील, विभागातील एखाद्या मंदिराला नोटीस आली की मग आपली धावपळ सुरू होते, आणि हाती निराशा येते. या विषयाबाबत भरपूर दिवस अभ्यास करत होतो त्यानुसार या लेखात काही कारणे सांगणार आहे आणि त्यावर उपायही सांगणार आहे ... तेंव्हा लेख पूर्ण वाचा. आपल्या विभागातील जुन्या मंदिरांना नोटिस का येतात त्याची  कारणे  -- प्रथमतः मंदिर आणि घर यात फार मोठा फरक असतो. काही चांगले सज्जन, धार्मिक लोक आपल्या घरात /घराजवळ एखाद्या जागेत /एखाद्या पवित्र ठिकाणी /झाडाखाली एखादया प्राचीन मूर्तीची स्थापना करतात. आणि मग त्या देवांची तिथे पूजा अर्चा करतात. आता निश्चित अशा प्रकारे स्थापना करणारे जे धार्मिक घराणं आहेत त्या काळात मंदिराबाबत कोणतीही कागदपत्रे ठेवत नाहीत, त्यांच्यासमोर तसा प्रश्न उद्भवत नाही. मग त्यांची हयात संपली की त्यांच्या पुढील पिढीस ते सर्व हस्तांतरित करतात. ...

भिडे गुरुजींच्या विरोधकांना कोर्टाची चपराक !

इमेज
विषय दंड भरण्याचा नव्हता ... विषय होता न केलेला गुन्हा मान्य करुन आपण असत्याला सत्य का म्हणायच ? १६ डिसेंबर २०१८ रोजी मुंबईत शिवडी येथे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींच्या शिवचरित्र आणि सुवर्ण सिंहासनसंदर्भात व्याख्याना वेळी काही संघटनांनी भिडे गुरुजींच्या व्याख्यानाला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी केलेल्या सुचनेनुसार उघड्या मैदानावर व्याख्यान न घेता शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी बंदिस्त सभागृहात हे व्याख्यान घेतले होते. या व्याख्यानात हजारांच्या आसपास शिवभक्त उपस्थित होते.  या व्याख्यानासाठी बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग कार्यालयातून रितसर पैसे भरून परवानगी घेण्यात आली होती. बंदिस्त सभागृहात व्याख्यान असल्याने पोलिसांनीही सहकार्य केले होते. व्याख्यान तीन तास सुरळीत पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी रफी अहमद किडवाई पोलिसांचे आभार मानण्यासाठी एक आभार पत्र पोलिसांना दिले. कायदेशीर मार्गाने आदरणीय भिडे गुरुजींचे आयोजित व्याखानाला विरोध केला होता त्या भीम आर्मी, बहुजन  रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भारत एकता मिशन यांच्या विरोधात पोलि...

संभाजीराव भिडे गुरुजी यांची डिगरी आणि शिक्षण

इमेज
भिडे गुरुजींच्या शिक्षणाविषयी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यावर त्यांच्या धारकऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया BBC मराठी आणि TV9 वाल्यांनी कोणतीही पुर्ण  माहिती न घेता कुठल्यातरी अर्धवट माहितीवर फेकाफेकी केली...  मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांनी दिलेली प्रतिक्रिया...  "ज्यांनी ६०- ७० वर्षापुर्वी संन्यस्त जीवन जगायच आणि फक्त देव देश आणि धर्मासाठी कार्य करायच अस ठरवून आपलं घर त्यागलं... आपले नातेवाईक त्यागले ... असलेली नसलेली संपत्ती सोडून दिली ... संन्यस्त जगायच म्हणून पायात काहीही न घालता अनवाणी फिरतात ... ज्यांच्याकडे स्वतःच अस काही नाही.... जे दुसऱ्याने दिलेल्या १० बाय १० च्या घरात राहतात .... इतकचं काय तर ज्या घरात राहताय त्याला साधं कुलुपही लावत नाही....  ज्यांनी देव देश धर्मासाठी सर्वस्व त्यागले आहे अशा त्यागी ... योगी ... शिवतपस्वी महनीय व्यक्ती ६० - ७०  वर्षापुर्वीचे  आपले शिक्षणाचे सर्टिफिकेट सोबत घेउन फिरतील असा विचारच काहींच्या डोक्यात येतो कसा ?? आज ती सर्टिफिकेट असली काय आणि नसली काय त्याने आदरणीय गुरुजींना मानणाऱ्या लाखों धारकऱ्यांना त्याने का...

रावणाची स्टटंबाजी आणि दलित बांधवांची दिशाभूल

इमेज
रावणाचा स्टंटपणा आणि दलित बांधवांची दिशाभूल उत्तर प्रदेश मधील सहारनपुर येथे झालेल्या जातीय दंगलीचा मुख्य सुत्रधार आणि आरोपी असलेला चंद्रशेखर आझाद उर्फ रावण याला १४ महिन्यांची शिक्षा झाली होती.   असा हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला रावण अचानकपणे ऐन १ जानेवारीच्या तोंडावर महाराष्ट्रातील कोरेगांव भीमा येथील विजयस्तंभ स्मारकाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रात येण्याचा आग्रह धरतो काय आणि त्याला मिडिया डोक्यावर घेते काय ......  सगळचं आधीच प्रिप्लान ठरल्याप्रमाणे घडतं ! या रावणाने २०१४ ला एक नवीन संघटना सुरु केली. त्याचा मुख्य उद्देश हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष आणि त्यांना २०१९ ला सत्तेपासून रोखणे. याबद्दल हा रावण जाहीरपणे हे बोलतोही. आधीच दलित बांधव वेगवेगळ्या संघटनांच्या गराड्यात अडकलाय आणि याने आणखी एक वेगळी संघटना सुरु केली. काय तर म्हणे बहुजनांचे एकत्रीकरण करायचे आहे. हा काल मुंबईत आला. याने आग्रह धरला की याला वरळीत सभा घ्यायचीय. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी याला परवानगी नाकारली. तशी परवानगी पोलीस अनेकांना अनेक कारणामुळे नाकारतात. पण पुन्हा ठरवल्याप्रमाणे...

दलित बांधवांना सत्य समजलं ?

इमेज
दलित बांधवांना सत्य समजलं ? आंबेडकरी चळवळीशी ज्यांची नाळ जोडली गेलीय असे अनेक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते नेहमीच समाजासोबत देशहिताचा विचार करताना आढळतात. त्यांना राजकारणापेक्षा दलित हित जास्त महत्त्वाचे वाटते म्हणूनच की काय त्यांना काही राजकारणी लोक नेहमीच दूर ठेवतात.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खऱ्या अर्थाने मानणारा दलित समाज कधीच राजकीय लोकांच्या राजकारणाला बळी पडला नाही. तो नेहमीच आपल्या तत्वाला धरून आंबेडकरी चळवळ सुरु ठेवत राहिला, जपत राहिला ! समाज हितासोबतच देशहित महत्त्वाचे हे जाणूनच १ जानेवारी २०१८ ला झालेली ( ठरवून केलेली ) कोरेगाव - भीमा दंगलीला महाराष्ट्रातील दलित बांधवांनी महाराष्ट्रभरात पसरू दिले नाही. या दंगलीला जबाबदार म्हणून ज्यांची नावे समोर आली होती ते संभाजीराव भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात एकही सबळ ठोस पुरावा नसतानाही काहींनी जाणीवपूर्वक महाराष्ट्राला वेठीस धरून महाराष्ट्राचे करोडो रुपयाचे नुकसान करून महाराष्ट्राची संपत्ती जाळून भस्मसात केली. का ? तर त्यांना महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य हवे होते म्हणून....  ही गोष्ट महाराष्ट्रातील द...

नाण्याच्या दोन बाजू

इमेज
पाहण्यासारख्या - नाण्याच्या दोन बाजू एका बाजूला अफाट पैसा आणि घृणा तर दुसऱ्या बाजूला अपार निष्ठा आणि श्रद्धा मुंबईसह महाराष्ट्रभरात एक विषय गेले काही महिने वादग्रस्त बनून राहिला आहे. तो म्हणजे १ जानेवारी रोजी कोरेगाव - भीमा येथे घडलेली नियोजनपुर्ण दंगल आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी ! कोरेगाव - भीमात दंगल घडली आणि त्याचे पडसाद ३ जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्रात उमटले. या दंगलीला जबाबदार म्हणून काही नावे समोर आली ते म्हणजे सांगलीचे संभाजीराव भिडे गुरुजी आणि पुण्याचे मिलिंद एकबोटे यांचे. भिडे गुरुजी हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाची संघटना चालवणारे भिडे गुरुजी उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेत. छत्रपती श्रीशिवाजी महाराज आणि छत्रपती श्रीसंभाजी महाराज या दोन महाराष्ट्राच्या आराध्यदैवतांभोवती कार्य करणारी संघटना म्हणून ओळख ! कोरेगाव भीमा दंगलीत संभाजीराव भिडे गुरुजींचे नाव यात येताच त्यांच्या विरोधात महाराष्ट्रभरात रान उठवल गेलं.  काहींनी सांगितले की, "मी भिडे गुरुजींना दगड मारताना पाहिल." काहींनी म्हटल की "दंगलीला संभाजी भिडे गुरुजी जबाब...