स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हुतात्मा छत्रपती'
"मराठ्यांनी आपल्या शत्रूविरूध्द चालू केलेल्या क्रांतीयुध्दाच्या राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करीत असता मराठ्यांचा हा राजा 'निधनाच्या क्षणात परिस्थितीचा प्रतिमल्लच नाही तर विजेता झाला !' - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 'हुतात्मा छत्रपती' संभाजी महाराजांवरील लेखाचे खंडण मंडण थोर क्रांतिकारक, हिंदुत्ववादी विचारवंत, राष्ट्रीय इतिहासकार व साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या 'हिंदुपदपादशाही' ( १९२८ ) या गाजलेल्या ग्रंथातील छत्रपती संभाजी महाराजांवरील एक लेख 'हुतात्मा छत्रपती' यावर अनेक स्वा. सावरकरद्रोही लोकांनी त्या लेखातील एक दोन शब्दांवरुन गदारोळ माजवून स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काहीबाही पसरवायला सुरुवात केली आहे. त्या लेखामागील पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांनी १९९० साली प्रकाशित केलेल्या 'छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ' या संशोधनपर ग्रंथात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या लेखासंबधी विचारपूर्वक खंडण मंडण केले ...