पोस्ट्स

Raigad लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गडावर भेटणारा तो अनोळखी गडी

इमेज
आपल्याला कुठे जायचे आहे. कुठल्या मार्गाने जायचे आहे. यांचे आणि आपले नाते नक्की कधी जुळले ? काय आहे हे नातं ? कोण आहेत की निष्ठावंत साथ देणारी आणि तुमच्याकडून काहीच अपेक्षा न ठेवणारी  ? गडाचा सगळा घेरा, त्यांच्या वाटा सर्व काही यांना आधीच ठाऊक असल्यासारखं, गडावरील प्रत्येक ठिकाण यांना ठाऊक असते. कोण असतात ही.....                गडावर भेटणारा तो अनोळखी गडी           --------------------------------------                                          - बळवंतराव दळवी ओळख नाही पाळख नाही न त्याला आपण स्वतःहून गडकिल्ल्यावर जातानाचा संदेश दिला असतो. पण जणू आपण गडावर येणार हे त्याला आधीच कोणी सांगितलेलं !  कधी तो फार पुढे तर कधी वाट बघत दुरुन आपल्याकडे लक्ष ठेवू असतो. आपण थोडा विसावा घेतो. तो लगेच आपल्या जवळ येतो. आपल्याकडे पाहतो. जणू म्हणत असतो,  "चाला बिगीन बिगीन लैय चढ हाय अजून." तो पुढे असल्याने आपल्याल...

रायगड असाही पहावा

इमेज
.....असे अगणित क्षण ज्या गडाने पाहिले.. जो या अमुल्य इतिहासाचा भाग आहे... नाही ती अविभाज्य घटना आहे... असा हा रायगड ...      कर्नाटकाच्या स्वारीवर जाण्यापुर्वी सोयराबाईंनी शिवछत्रपतींकडे संभाजीराजे आणि राजाराम यांना एकत्र रायगडावर ठेवू नका म्हणून सुचविले होते. सोयराबाईचे हे म्हणणे महाराजांना पटणारे नव्हते पण ... नाईलाजाने त्यांनी ते मान्य केले आणि कर्नाटकात निघण्यापूर्वी महाराजांनी सभा भरविली. महाराज सिंहासनावर बसलेले असताना युवराज संभाजीराजे तिथे गेले. शंभूराजांनी आपल्या वडिलांच्या पायावर डोके टेकवले. महाराजांनी त्यांना आपल्या जवळ बसण्याचा आग्रह केला. पण राजनीतीचा अभ्यास केलेले संभाजीराजे त्यांच्या बाजूला बसले नाही. शिवछत्रपतींनी आपल्या ज्येष्ठ मुलाकडे पाहात म्हणाले, "बाळा, मला हे राज्य कसे मिळाले ते ऐक. माझे बुध्दीमान वडील शहाजीराजे माझी सामुद्रिक लक्षणे पाहून श्रेष्ठ राजनीतीचा विचार असल्यामुळे त्यांनी मला उद्देशून म्हणाले ,  "मोठे असले तरी हे राज्य मला पुरेसे नाही. तेव्हा तू अन्य राज्याच्या प्राप्तीसाठी उद्योगाला लागले पाहिजेस. माझी इतरही मुले आहेत. त्...

किल्ले रायगडावरील 'त्या' अपरिचित तोफा

इमेज
  गेली २० वर्षे सातत्याने किल्ले रायगडावर जाणारे शिवचरित्र अभ्यासक बळवंतराव दळवी यांनी स्वतः किल्ले रायगडावर पाहिलेल्या त्या सर्व अपरिचित तोफांची माहिती देताना आमच्या प्रतिनिधींशी केलेला हा संवादपर माहिती लेख... "वि.वा. जोशी यांचे १९२९ साली लिहिलेल्या   'राजधानी रायगड' या पुस्तकात रायगडावरील तोफांविषयी लिहिलेले आहे. त्यांना १४ ते १५ तोफा  रायगडावर  आढळल्या होत्या. त्यानंतर १९६२ साली शा. वि. आवळस्कर यांच्या 'रायगडाची जीवनकथा' या पुस्तकात १७ तोफांविषयी जुजबी माहिती आहे. गो. नी. दांडेकर यांनी १९६५ साली लिहिलेल्या ' शिवतीर्थ रायगड ' या पुस्तकात त्यांनी रायगडावरील १५ तोफांविषयी बरीच व्यवस्थित आणि विस्तृत माहिती लिहिलेली आहे. आज रायगडावर १५ तोफा दिसतात.   परंतु शिवकालात बहुत तोफा असल्या पाहिजेत. बहुधा त्यातील बऱ्याचशा इंग्रज आणि पोतुगीजांकडून घेतलेल्या असाव्यात. इंग्रज - पोतुगीजांकडील तोफा चांगल्या उत्तम घडणींच्या असतात हे शिवछत्रपतींना माहित होते. नसत्या गोष्टीत स्वदेशीचा अभिमान धरण्याइतके ते हेकट कधींच नव्हतें.  तोफांनी स...

शिवछत्रपतींच्या सुवर्ण सिंहासनाची आज गरज काय ?

इमेज
हा प्रश्न अनेकांकडून सातत्याने शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांना विचारला जातो. सोबतच 'असा निधी एकत्र करून गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हायला हवे, गोरगरिबांना मदत करायला हवी' वैगरे वैगरे मतप्रवाह अनेकांकडून व्यक्त झालेले दिसून आले आहे.  यावर आम्ही मुंबईतील धारकरी आणि शिवचरित्राचे अभ्यासक बळवंतराव दळवी यांच्याशी यासंदर्भात विचारले असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, "शिवछत्रपतींनी त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते विधिवत सिंहासनाधिश्वर छत्रपती झाल्यानंतर औरंगजेबाने ज्यांना बळाने बाटवून मुसलमान केले होते अशा नेतोजी पालकरांना शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वधर्मात घेतले. हे शिवछत्रपतींनी का केलं असावं ? दुसऱ्या बाजूला महाराजांनी आपल्या व्यावहारात घुसलेले परकीय शब्द काढून टाकून आपले शब्द वापरता आणण्यासाठी 'राज्यव्यवहारकोश' तयार केला. हा राज्यव्यवहारकोश महाराजांनी का तयार केला ? उत्तर फार सोपं आहे ....  शिवाजी महाराज मुसलमानी जुल्मी सत्तेविरूद्ध लढून छत्रपती राजे झाले होते त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आहे आणि स्वतःची सत्ता आल्यावर जर आपण आपल्य...