पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता ?' या पुस्तकाची दूसरी बाजू
म. फुले इतिहाससंशोधक नव्हते किंवा इतिहासकार नव्हते. समतेचा पुरस्कार व प्रचार करणारे कर्ते सुधारक म्हणून त्यांनी शिवाजीस असे म्हटले असेल म्हणून त्यांचा पोवाड्याचा आधार दूर करता येणे शक्य आहे ." (पान क्र. ५०) शिवाजी कोण होता ? या पुस्तकात स्व. गोविंद पानसरे लिहितात... -------------------------------------------------------- ● शिवाजी आणि धर्म - "शिवाजी हिन्दू होता. शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला व त्याची कर्मभुमीही महाराष्ट्रच होती. यामुळे हिंदूंना शिवाजीसंबंधी अभिमान वाटतो. त्यातल्यात्यात महाराष्ट्रीय हिंदूंना जरा जास्तच अभिमान वाटतो. (पान क्र. २३) ● देवळांची लुट, मोड़तोड इत्यादि - मुस्लीम संघटनांचे त्याच्या अनुयायांना प्रतिपादन असते की,हिंदू धर्म म्हणजे काफरांचा धर्म. आपल्या पूर्वजांनी तो बुडवण्यासाठी प्रयत्न केले ते बरोबरच केले. जमले तर आपणही तसेच करावे. निदान हिंदूंविरुध्द आपणअसावे" असा त्यांचा प्रचार असतो व आहे . आपण राज्यकर्ते (होतो) परंतु राज्यकर्ते म्हणून आपले महत्व नाही ही खंत आणि त्य...