पोस्ट्स

mahatma fule लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महात्मा फुले आणि १९ फेब्रुवारीची शिवजयंती

इमेज
ज्यांना शिवभारतावर विश्वास नाही, जे जेधे शकावली मानत नाही पण जे महात्मा जोतिराव फुलेंना मानतात त्यांच्यासाठीच हा छोटा लेख मांडत आहे. लेख पूर्ण वाचूनच आपले मत मांडावे ही नम्र विनंती राहिल. आज अनेक जण इंग्रजी तारखेनुसार श्रीशिवछत्रपतींची जयंती साजरी करताना १९ फेब्रुवारीला पहिल्यांदा शिवजयंती साजरी करणारे म्हणून महात्मा फुलेंचा उल्लेख करतात . आणि हे पटवून देण्याकरिता एका चित्रपटातील video दाखवला जातो त्यात महात्मा फुलेंनी १९ फेब्रुवारी १८६९ ला पहिली शिवजयंती साजरी केल्याचं दाखवलं, सांगितले जातं. पण ..... आता स्वतः महात्मा जोतिराव फुले त्यांनी शिवछत्रपतींवर लिहिलेल्या पोवाड्यात काय लिहितात हे पाहू .... पंधराशे एकूण पन्नास साल फळलें  जुन्नर ते उदयांशी आले | शिवनेरी किल्ल्यांमध्यें बाळ शिवाजी जन्मलें जिजीबाइस रत्न सापडलें || १८६९ साली लिहोलेल्या या पोवाड्यात महात्मा फुले शिवजन्माचा उल्लेख करतात तो १५४९ चा. इथे १५४९ हे शिवजन्माचे इंग्रजी साल नसून ते शालिवाहन शके १५४९ या शिवजन्माच्या हिंदू तिथीचे वर्ष आहे  . आणि जुन्या किंवा पारंपरिक शिवजयंतीचे साल १६२७ आणि शके...