पोस्ट्स

bhide guruji लेबलसह पोस्ट दाखवत आहे

श्री नर्मदा परिक्रमा आणि भिडे गुरुजींचा धारकरी

इमेज
श्री नर्मदा परिक्रमा आणि भिडे गुरुजी ! साधारण माणसांचा एकदाच जन्म होतो. जन्म, शिक्षण, लग्न, पोरंबाळ, संसार, म्हातारपण आणि शेवटी मरण ! यात विशेष असं काहीच नसत .आमचाही पहिला जन्म असाच झाला. सगळचं साधारण ! या साधारण आयुष्याच्या वाटेवर आम्हांला भिडे गुरुजी नावाच्या तरूण म्हाताऱ्याने आमच्या हातात शिवचरित्र ठेवलं. सत्व, स्वाभिमान, देव, देश, धर्म हळूहळू  समजु लागला. इतिहास आवडु लागला. या गुरूजींनी आम्हांला शिवकाळ दाखवला. सह्याद्री दाखवला. आंम्हाला मोहिम नावाचा संजीवनी मंत्र आमच्या अंगात भिनवला. मनं पेटवल. धमन्या फरफरु लागल्या. भिडे गुरुजी म्हणजे राष्ट्रतेजाचा झंझावात.  लाखो तरुणांना शिवप्रभुंची वाट दाखवणारा हाच तो अवलिया!  हजारो तरुणांना निर्व्यसनी बनविणारा हाच तो संत. नेहमी खरं बोलायला लावणारा हाच तो महंत ! बाकी साधु , संत ,मंहाताची व्याख्या अनेक बैलांना न समजण्याच्या पलिकडची आहे. मुर्दाड जिवन जगणाऱ्या लोकांना संतमहंताची व्याख्या सहसा समजणार नाही. हे दुर्देव आहे महाराष्ट्रच ........ महाराष्ट्राला शिवछत्रपती सुध्दा अजुनही समजले नाहीत. समजले असते तर महाराष्ट्र काही और...

भिडे गुरुजींचे 'त्या' धारकऱ्याबद्दलचे 'ते' मत

इमेज
आदरणीय श्री. संभाजीराव भिडे गुरुजी हे नाव महाराष्ट्राला नविन नाही. त्यांच्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे कार्य उभ्या महाराष्ट्रात सुरु आहे. तरुणांमध्ये श्रीशिवछत्रपती - श्रीसंभाजीमहाराज रुजवण्याचे काम त्यांचे धारकरी अत्यंत तळमळीने करत असतात. या संघटनेत पद पैसा आणि प्रसिद्धी या गोष्टीना अजिबात थारा नाही. संपूर्ण वर्षभरातील त्यांचे उपक्रम ठरलेले आणि नियोजित असतात.  भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यात येउन ज्यांना अनेक वर्षे झाली असे मुंबई विभागाचे प्रमुख बळवंतराव दळवी यांनी दिलेली ही माहिती   "२०१८ ... ठाण्यातील बैठकीसाठी मुंबईतून आदरणीय गुरुजींना घेऊन मी ठाण्यात एका धारकरी बंधूच्या घरी पोहचलो.  मुंबईतून आलेल्या धारकऱ्यांनी जेवण करून घेतलं... पण गुरुजींनी "माझा आज उपवास होता तो आज सकाळीच सुटला आता मी अन्नप्राशन करणार नाही  !" असं ठामपणे म्हटले आणि एका बाजूला वर्तमानपत्र वाचत बसले. थोडा निवांत वेळ मिळताच मी गुरुजींच्या समोर बसलो... अनेक दिवसांची घालमेल त्यांच्यासमोर मांडली..... "गुरुजी, मुंबईची जबाबदारी माझ्याकडून काढून कोणा दुसऱ्याव...

शिवछत्रपतींच्या सुवर्ण सिंहासनाची आज गरज काय ?

इमेज
हा प्रश्न अनेकांकडून सातत्याने शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांना विचारला जातो. सोबतच 'असा निधी एकत्र करून गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हायला हवे, गोरगरिबांना मदत करायला हवी' वैगरे वैगरे मतप्रवाह अनेकांकडून व्यक्त झालेले दिसून आले आहे.  यावर आम्ही मुंबईतील धारकरी आणि शिवचरित्राचे अभ्यासक बळवंतराव दळवी यांच्याशी यासंदर्भात विचारले असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, "शिवछत्रपतींनी त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते विधिवत सिंहासनाधिश्वर छत्रपती झाल्यानंतर औरंगजेबाने ज्यांना बळाने बाटवून मुसलमान केले होते अशा नेतोजी पालकरांना शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वधर्मात घेतले. हे शिवछत्रपतींनी का केलं असावं ? दुसऱ्या बाजूला महाराजांनी आपल्या व्यावहारात घुसलेले परकीय शब्द काढून टाकून आपले शब्द वापरता आणण्यासाठी 'राज्यव्यवहारकोश' तयार केला. हा राज्यव्यवहारकोश महाराजांनी का तयार केला ? उत्तर फार सोपं आहे ....  शिवाजी महाराज मुसलमानी जुल्मी सत्तेविरूद्ध लढून छत्रपती राजे झाले होते त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आहे आणि स्वतःची सत्ता आल्यावर जर आपण आपल्य...

पॅकेजवाले पत्रकार

इमेज
आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींना नाहक बदनाम करण्यासाठी २०१६ पासून अत्यंत फालतू बोगस पत्रकारांची एक मोठी टीम मिळणाऱ्या पैशासाठी हाती आलेले पॅकेज News चालवून गुरुजींची बदनामी करत आले आहेत. अत्यंत फालतू पत्रकारिता करून स्वतःला पत्रकार म्हणवून घेणारी लोक समाजात उदयास आली आहेत. कोणत्यातरी वर्तमापत्रात टेंपररी ( घरात बसून खर्डेघाशी पत्रकारिता ) करून स्वतःला पत्रकार म्हणवून घेत ही लोक हाती आलेले पॅकेज सातत्याने पसरवून बिनधास्तपणे खोटे पसरवत असतात. उदाहणादाख ल -  १) २०१६ सालीे लोअरपरळ येथे एका शाळेच्या भल्या मोठ्या सभागृहात किमान दिड हजार शिवभक्त सलग तीन तास भिडे गुरुजींचे व्याख्यान सुरू असताना एका संघटनेत ज्यात पुरूष नसावेत म्हणून त्यांनी काही स्त्रियांना गुरुजींच्या व्याख्यानात व्यत्यय आणण्यासाठी पाठवले असताना त्यांना आम्ही अत्यंत आदराने सभागृहाबाहेर नेले असताना अवघ्या काही मिनिटांत एक बातमी काही online वर्तमानपत्रांमधून पसरवली गेली. या बातमीचा मथळा थोडा वेगळा असला तरी बातमी एकच होती. "भिडे गुरुजींना वर्गात कोंडल" 'भिडे गुरुजींना खोलीत कोंडल' अमुक संघटनेच्या लोका...

कोरेगाव भीमा लढाईच्यावेळी महार रेजिमेंटच नव्हती ? काय आहे सत्य ?

इमेज
१ जानेवारी १८१८ च्या कोरेगाव - भीमा लढाईत पेशवे किंवा इंग्रज यांच्यापैकी कुणीही ही लढाई जिंकलं अथवा हरलं नाही अशी गोप्यस्फोट करणारी माहिती इतिहास संशोधक चंद्रकांत शामराव पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी समितीपुढे बुधवारी मांडली आहे.  चंद्रकांत पाटील यांनी पुरावा म्हणून शेकडो पानांसह प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कोलकाता हायकोर्टाचे माजी सरन्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीपुढे सुनावणी सुरू आहे. कोरेगाव भीमाची लढाई बडोद्याच्या गायकवाडांचे मंत्री गंगाधर शास्त्री पटवर्धन यांची हत्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू त्रिंबकजी डेंगळे यांनी घडवल्यावरून झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. ही लढाई कुठल्याही जाती वा धर्माशी संबंधित नव्हती असे सांगतानाच पाटील यांनी प्रसारमाध्यमांमध्ये आलेली ५०० महार व पेशव्यांचे २८ हजार सैनिक यांच्यात झाल्याची माहिती संशयास्पद असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.  महार रेजिमेंटची स्थापना १९४१ साली झाली, त्यामुळे त्यांचा १८१८ च्या लढाईत सहभाग असण्याचा प्रश्नच येत नाही . असा दावा पाटील यांनी केला आहे. गेले पाच महिने आपण जयस्तंभाश...

दलवाईं तुमचे डोके ठिकाणावर आहे काय ?

इमेज
नाणार - आरे यातील आंदोलन आणि भीमा कोरेगावची हिंसक दंगल दोन्ही एकच कसे ?  महाराष्ट्रात नव्याने सत्तेत आलेले सरकार हे जरी शिवसेनेच्या मुख्यमंत्री नेतृत्वाखाली उभं राहिलेले असले तरी त्याला अनेक पक्षांनी टेकू दिला आहे. जो तो पक्ष आपआपला स्वार्थ काढून घेण्यासाठी धडपडताना दिसत आहे. मग ते पद असो की त्यांचा छुपा अजेंडा ..... ऐकेबाजुला कॉंग्रेस - राष्ट्रवादी असे सर्वधर्मसमभाव मानणारे पक्ष तर दुसरीकडे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना असं पूर्णपणे विरूध्द विचारांची ही आघाडी किती दिवस टिकेल हा प्रश्न आहेच .... पण जितके दिवस टिकेल त्यातही आपला मुद्दा आपला स्वार्थ कसा काढून घेता येइल यावरच भर असेल असेच वाटत आहे ... अशावेळी जितेंद्र आव्हाड आणि हुसेन दलवाई आपल्या मागण्या घुसवत पुढे आलेले दिसून आले. या दोघांनी नाणार आणि आरे आंदोलकांवरील ठाकरे सरकारने मागे घेतलेल्या गुन्हाच्या हवाला देत भीमा - कोरेगाव दंगल प्रकरणातील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी ठाकरे सरकारकडे केली आहे. यावेळी हुसेन दलवाईसारख्या बुजुर्ग राजकारणी व्यक्तीकडे पाहून विचार येतो की, ...

भिडे गुरुजींच्या विरोधकांना कोर्टाची चपराक !

इमेज
विषय दंड भरण्याचा नव्हता ... विषय होता न केलेला गुन्हा मान्य करुन आपण असत्याला सत्य का म्हणायच ? १६ डिसेंबर २०१८ रोजी मुंबईत शिवडी येथे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींच्या शिवचरित्र आणि सुवर्ण सिंहासनसंदर्भात व्याख्याना वेळी काही संघटनांनी भिडे गुरुजींच्या व्याख्यानाला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी केलेल्या सुचनेनुसार उघड्या मैदानावर व्याख्यान न घेता शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी बंदिस्त सभागृहात हे व्याख्यान घेतले होते. या व्याख्यानात हजारांच्या आसपास शिवभक्त उपस्थित होते.  या व्याख्यानासाठी बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग कार्यालयातून रितसर पैसे भरून परवानगी घेण्यात आली होती. बंदिस्त सभागृहात व्याख्यान असल्याने पोलिसांनीही सहकार्य केले होते. व्याख्यान तीन तास सुरळीत पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी रफी अहमद किडवाई पोलिसांचे आभार मानण्यासाठी एक आभार पत्र पोलिसांना दिले. कायदेशीर मार्गाने आदरणीय भिडे गुरुजींचे आयोजित व्याखानाला विरोध केला होता त्या भीम आर्मी, बहुजन  रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भारत एकता मिशन यांच्या विरोधात पोलि...

संभाजीराव भिडे गुरुजी यांची डिगरी आणि शिक्षण

इमेज
भिडे गुरुजींच्या शिक्षणाविषयी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यावर त्यांच्या धारकऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया BBC मराठी आणि TV9 वाल्यांनी कोणतीही पुर्ण  माहिती न घेता कुठल्यातरी अर्धवट माहितीवर फेकाफेकी केली...  मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांनी दिलेली प्रतिक्रिया...  "ज्यांनी ६०- ७० वर्षापुर्वी संन्यस्त जीवन जगायच आणि फक्त देव देश आणि धर्मासाठी कार्य करायच अस ठरवून आपलं घर त्यागलं... आपले नातेवाईक त्यागले ... असलेली नसलेली संपत्ती सोडून दिली ... संन्यस्त जगायच म्हणून पायात काहीही न घालता अनवाणी फिरतात ... ज्यांच्याकडे स्वतःच अस काही नाही.... जे दुसऱ्याने दिलेल्या १० बाय १० च्या घरात राहतात .... इतकचं काय तर ज्या घरात राहताय त्याला साधं कुलुपही लावत नाही....  ज्यांनी देव देश धर्मासाठी सर्वस्व त्यागले आहे अशा त्यागी ... योगी ... शिवतपस्वी महनीय व्यक्ती ६० - ७०  वर्षापुर्वीचे  आपले शिक्षणाचे सर्टिफिकेट सोबत घेउन फिरतील असा विचारच काहींच्या डोक्यात येतो कसा ?? आज ती सर्टिफिकेट असली काय आणि नसली काय त्याने आदरणीय गुरुजींना मानणाऱ्या लाखों धारकऱ्यांना त्याने का...

रावणाची स्टटंबाजी आणि दलित बांधवांची दिशाभूल

इमेज
रावणाचा स्टंटपणा आणि दलित बांधवांची दिशाभूल उत्तर प्रदेश मधील सहारनपुर येथे झालेल्या जातीय दंगलीचा मुख्य सुत्रधार आणि आरोपी असलेला चंद्रशेखर आझाद उर्फ रावण याला १४ महिन्यांची शिक्षा झाली होती.   असा हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला रावण अचानकपणे ऐन १ जानेवारीच्या तोंडावर महाराष्ट्रातील कोरेगांव भीमा येथील विजयस्तंभ स्मारकाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रात येण्याचा आग्रह धरतो काय आणि त्याला मिडिया डोक्यावर घेते काय ......  सगळचं आधीच प्रिप्लान ठरल्याप्रमाणे घडतं ! या रावणाने २०१४ ला एक नवीन संघटना सुरु केली. त्याचा मुख्य उद्देश हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष आणि त्यांना २०१९ ला सत्तेपासून रोखणे. याबद्दल हा रावण जाहीरपणे हे बोलतोही. आधीच दलित बांधव वेगवेगळ्या संघटनांच्या गराड्यात अडकलाय आणि याने आणखी एक वेगळी संघटना सुरु केली. काय तर म्हणे बहुजनांचे एकत्रीकरण करायचे आहे. हा काल मुंबईत आला. याने आग्रह धरला की याला वरळीत सभा घ्यायचीय. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी याला परवानगी नाकारली. तशी परवानगी पोलीस अनेकांना अनेक कारणामुळे नाकारतात. पण पुन्हा ठरवल्याप्रमाणे...

दलित बांधवांना सत्य समजलं ?

इमेज
दलित बांधवांना सत्य समजलं ? आंबेडकरी चळवळीशी ज्यांची नाळ जोडली गेलीय असे अनेक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते नेहमीच समाजासोबत देशहिताचा विचार करताना आढळतात. त्यांना राजकारणापेक्षा दलित हित जास्त महत्त्वाचे वाटते म्हणूनच की काय त्यांना काही राजकारणी लोक नेहमीच दूर ठेवतात.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खऱ्या अर्थाने मानणारा दलित समाज कधीच राजकीय लोकांच्या राजकारणाला बळी पडला नाही. तो नेहमीच आपल्या तत्वाला धरून आंबेडकरी चळवळ सुरु ठेवत राहिला, जपत राहिला ! समाज हितासोबतच देशहित महत्त्वाचे हे जाणूनच १ जानेवारी २०१८ ला झालेली ( ठरवून केलेली ) कोरेगाव - भीमा दंगलीला महाराष्ट्रातील दलित बांधवांनी महाराष्ट्रभरात पसरू दिले नाही. या दंगलीला जबाबदार म्हणून ज्यांची नावे समोर आली होती ते संभाजीराव भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात एकही सबळ ठोस पुरावा नसतानाही काहींनी जाणीवपूर्वक महाराष्ट्राला वेठीस धरून महाराष्ट्राचे करोडो रुपयाचे नुकसान करून महाराष्ट्राची संपत्ती जाळून भस्मसात केली. का ? तर त्यांना महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य हवे होते म्हणून....  ही गोष्ट महाराष्ट्रातील द...

..... खरचं मिर्च्या का झोंबतात ?

इमेज
....खरचं मिर्च्या का झोंबतात ? "तुम्ही माझ्या कार्यक्रमाची वाट लावली दळवी !" हे अत्यंत ह्रदयस्पर्षी वाक्य आहे जय महाराष्ट्र News चैनलच्या आशिष जाधव या राजकीय संपादकाचे .... राज्यातील अनेक राजकीय नेत्यांवरील राजकीय गुन्हे राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर एका RTI कार्यकर्त्यांच्या माहिती अधिकारात अशी माहिती बाहेर आली की राज्य सरकारने एकूण ४१ गुन्हे मागे घेतले असून त्यामुळे हजारो जणांची न्यायालय फेरी बंद होणार आहे. या ४१ गुन्ह्यात सांगलीतील काही गुन्हे आहेत जसे २००८ जोधा अकबर चित्रपटवेळी संविधानिक मार्गाने चित्रपटाचा निषेध नोंदवणाऱ्या भिडे गुरुजींवर कृष्णप्रकाशने केलेला लाठीचार्ज आणि त्यामुळे सांगलीतील लोकांनी चिडून केलेली तोडफोड आणि बंद वेळी भिडे गुरुजींवर आणि इतर शेकडो लोकांवर गुन्हे नोंद झाले होते. सांगलीतील मिरजेत अफजलखान वधाच्या पोस्टवरुन गणेश मंडळांवर एका गटाने केलेला हल्ला आणि त्यानंतर उसळलेली दंगल यात दोन्ही बाजूकडील शेकडो लोकांवर गुन्हे दाखल झालेले होते. पण भिडे गुरुजींच नाव यात मुख्य आरोपी म्हणून नसतानाही अनेकांनी भिडे गुरुजींच्या नावाने शिमगा केला. ...

भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न फसला

इमेज
. ... आणि मिडियाची चोरी पकडली गेली !           पत्रकार, पत्रकारिता आणि Media म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असा प्रचार आणि प्रसार अनेक वर्ष सुरु आहे. अनेक पत्रकारांनी त्यांच्या लेखणीने सुवर्णकाळ गाजवलेला आहे. प्र. के. अत्रे पासून ते अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्या अग्रलेखाने भल्याभल्यांना दरदरुन घाम सुटलेला आम्ही पाहिला आहे. याच पत्रकारितेची दुसरी बाजू म्हणजे त्यांनी भल्या भल्या मोठ्या नेत्यांचे स्टिंग ओपरेशन करुन त्यांची खोटी बाजू उघड केलेली आपण आजतागायत पाहिली आहे.  आज त्याच्या उलट एक किस्सा घडला....  *** Now पत्रकार अरुनील **** ( नाव लवकरच उघड करु ) यांनी श्रीशिवप्रतिष्ठानचे मुंबई प्रमुख बळवंतराव दळवी यांना फोन करून 'कोरेगाव - भिमा प्रकरणात अनिता साळवे यांनी ८ महिन्यानंतर पुन्हा एकदा भिडे गुरुजी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात प्रिटिशन दाखल केली यावर आपल मत मांडा' म्हणून विचारणा केली. '८  महिन्यापूर्वी घडलेल्या दंगलीच्या घटने संदर्भात महाराष्ट्र सरकारने म्हणजेच मान. मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत सत्य सांगितले आहे आता त्यावर...

भिडे गुरुजी यांची स्फोटक मुलाखत

इमेज
भिडे गुरुजींची स्फोटक मुलाखत बेधडक - जशी आहे तशी मनू, डॉ.बाबासाहेब आणि आंबेपुराणावर काय बोलले भिडे गुरूजी? शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची सोमवा...