हेच तर महाराष्ट्राचे दुर्दैव....
कुठली फालतू कॉमेडियन पिलावळ उठसुठ देशाच्या राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक बोलून तर कधी हिंदू देवदेवतांची टिंगळ टवाळी करत विनोद करुन पैसे कमावण्यासाठी वाट्टेल ते जोक करतात. त्यांचे video सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. पण त्यांच्यावर तात्काळ कारवाई न करता महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेब असं म्हणतात की, "त्या कॉमेडियनवर कारवाई करण्याआधी कायदेशीर सल्ला घेण्यात येइल. चौकशी मध्ये जर दोषी आढळून आल्यास तर कारवाई केली जाईल !" पण .... दुसरीकडे मात्र शिवछत्रपतींच्या प्रेमापोटी शिवभक्तांनी रागाच्या भरात चुकीचे शब्द वापरुन त्या कॉमेडियनला प्रतिउत्तर दिले तर शिवभक्तांवर ताबडतोब कारवाई करण्यात आली. पण ज्यांनी शिवछत्रपतींचा अवमान जाहिररित्या केला, ज्यांचे आक्षेपार्ह Video अजूनही Youtube वर सर्रासपणे पाहिले जात आहेत त्यांच्या वक्तव्यांची चौकशी केल्यानंतर कारवाई होणार ??? याचसाठी महाराष्ट्रात राष्ट्रवादीने शिवसाम्राज्ययात्रा काढलेली काय ? जे डोळ्यांनी दिसत आहे त्यापैकी एकावर कारवाई आणि दुसऱ्याला मात्र अजूनही मोकाट सोडून चौकशीचे आदेश ? हीच तुमची शिवछत्रपतींच्या प्रति आदरभावना ? ती अग्...