पोस्ट्स

हेच तर महाराष्ट्राचे दुर्दैव....

इमेज
 कुठली फालतू कॉमेडियन पिलावळ उठसुठ देशाच्या राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक बोलून तर कधी हिंदू देवदेवतांची टिंगळ टवाळी करत विनोद करुन पैसे कमावण्यासाठी वाट्टेल ते जोक करतात. त्यांचे video सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. पण त्यांच्यावर तात्काळ कारवाई न करता महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेब असं म्हणतात की, "त्या कॉमेडियनवर कारवाई करण्याआधी कायदेशीर सल्ला घेण्यात येइल. चौकशी मध्ये जर दोषी आढळून आल्यास तर कारवाई केली जाईल !" पण .... दुसरीकडे मात्र शिवछत्रपतींच्या प्रेमापोटी शिवभक्तांनी रागाच्या भरात चुकीचे शब्द वापरुन त्या कॉमेडियनला प्रतिउत्तर दिले तर शिवभक्तांवर ताबडतोब कारवाई करण्यात आली.  पण ज्यांनी शिवछत्रपतींचा अवमान जाहिररित्या केला, ज्यांचे आक्षेपार्ह Video अजूनही Youtube वर सर्रासपणे पाहिले जात आहेत त्यांच्या वक्तव्यांची चौकशी केल्यानंतर कारवाई होणार ???  याचसाठी महाराष्ट्रात राष्ट्रवादीने शिवसाम्राज्ययात्रा काढलेली काय ? जे डोळ्यांनी दिसत आहे त्यापैकी एकावर कारवाई आणि दुसऱ्याला मात्र अजूनही मोकाट सोडून चौकशीचे आदेश ? हीच तुमची शिवछत्रपतींच्या प्रति आदरभावना ? ती अग्...

न विसरता येणारा 'अभ्यास' ...

इमेज
इयत्ता ४ थीत असताना पहिल्यांदाच शिवाजी महाराजांची गाठ पडली....  पहिल्याच पानावर राजे घोड्यावर बसलेले आणि सोबत मावळे असे चित्र आजही आठवते. इतिहासाचे संपुर्ण पुस्तकच महाराजांचा पराक्रम सांगत होतं. शौर्य, धैर्य, बुध्दिमत्ता, चातुर्य, लढाऊपणा, सर्व काही अगदी एखाद्या दैवी कथेप्रमाणे पानापानावर ओसंडून वाहत होतं. शिवरायांचे बालपण, शिवनेरी किल्ल्यावरील राजांचे जन्मस्थानाचा फोटो, रायरेश्वर मंदिरात बेलपत्र वाहून बालशिवबाने घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पाहताना आपल्यालाही मावळा वाहयाचं होतं ते चित्र आठवते का ? अफजलखानाने हात पसरुन राजांना दिलेलं आलिंगन आणि राजांनी काढलेला कोथळा हे वाचताना त्या बालवयातही हाताच्या मुठ्या आवळल्या जायच्या. आग्र्याच्या दरबारातील तो प्रसंग बादशहाच्या हातावर तुरी दिल्या, हे शिवरायांनी आम्हाला जगावं कसं हे शिकवलं.  गड आला पण सिंह गेला हा धडा वाचत असताना तानाजीसाठी शिवरायांना हळहळताना वाचून डोळ्यांच्या पापण्या ओल्या वाहायच्या ....... त्या वयातच शिवराय मनात घर करुन राहिले. आजही माझ्या ऐतिहासिक पुस्तकांच्या...

संभाजी महाराजांची हत्या आणि मनुस्मृती

इमेज
छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ...  होय हत्याच आणि तीही अमानुष हत्या औरंगजेबाने केली हे सर्वश्रुत आहेच...      आता संभाजी महाराजांच्या बलिदानाचा माझ्यासारखा एक सामान्य माणूस इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की, आपल्या मराठी इतिहासात म्हणजे संभाजी महाराजांच्या समकाळातील इतिहासात आपल्या लोकांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल काहीच लिहून ठेवलेले नाही. जे मुळ लिखाण उपलब्ध आहे ते औरंगजेबाच्या दरबारातील खाफिखान ... साकी मुसैदखान .... ईश्वरदास नागर ... यासारख्या औरंगजेबाच्या पदरी असलेल्या लोकांनीच संभाजी महाराजांच्या अंतिम क्षणाबदल लिहून ठेवले आहे आणि आज ते उपलब्धही आहे. तुम्ही म्हणाल असं कसं चिटणीस बखर वैगरे मध्ये लिहिले आहे की ... तर मित्रांनो चिटणीस बखर ही मुळातच शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतर १०० - १५० वर्षांनंतर लिहिली आहे हे आपण समजून घ्यायला हवे ! एक साधा विचार करा ... औरंगजेबाच्या दरबारात त्याचे उर्दु फारसी लेखणीक असतील की आपले मराठी लेखनकार असतील ? समजलं का काही ? छान ..... म्हणजे आता तुमच्या डोक्यात हा...

शिवजयंती कधी साजरी करावी ? तुमच्या अवघड प्रश्नांची सोपी उत्तरे...

इमेज
शिवजयंतीच्या तारखेविषयी आजही अनेक वेगवेगळी मते आहेत. त्याच प्रश्नांवरील सोप्या भाषेतील सोपी उत्तरे .... प्रश्न - शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला ? उत्तर - शालिवाहन शके फाल्गुन वद्य तृतीया त्यावेळी इंग्रजी दिनांक काय होती ? उत्तर - १९ फेब्रुवारी १६३० त्यावेळी इंग्रजी कालगणना कोणती होती ? उत्तर - ज्युलियन कालगणना हे सर्व शिवकालीन तिथी दिनांक आहेत पण ..... आज आपण कोणती हिंदू कालगणना वापरतो ? उत्तर आहे - हिंदू कालगणना - जी सनातन कालापासून सुरु आहे  आज आपण कोणती इंग्रजी कालगणना वापरतो ? उत्तर - ग्रेगरियन पुर्वी पाश्चिमात्य इंग्रजी ज्युलियन आणि ग्रेगरियन या दोन  कालगणनेत १० दिवसाचे अंतर होत .  म्हणून त्यांनी दोन कालगणने ऐवजी एकच कालगणना सुरु ठेवली ती म्हणजे ग्रेगरियन ज्या कालगणनेशी आपला काहीही संबंध नाही. ज्या दोन इंग्रजी कालगणनेत १० दिवसाचा फरक होता त्यानुसार ज्युलियन कालगणनेत शिवजन्म १९ फेब्रुवारी ( शिवकाल ) आणि ग्रेगरियन कालगणनेनुसार शिवजन्म १० दिवस पुढे म्हणजे १ मार्चला येतो अस म्हणता येइल पण ..... शिवछत्रपतींच्या काळा...

भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठानमध्ये दलित आणि बौध्द तरूणही ?

इमेज
२०१४ साली मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना किल्ले रायगडावर आमंत्रण देणारे  'भिडे गुरुजी' त्यानंतर संपूर्ण देशाला माहित झाले.  महाराष्ट्रात श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाची शिवभक्तांची संघटना चालवणाऱ्या भिडे गुरुजींच्या प्रतिष्ठानमध्ये मराठ्यांपासून सर्व जातीतील तरुण आणि वयोवृद्ध कार्य करतात हे समजल्यावर थोडी आणखी माहिती मिळते का हे पाहण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी काही धारकऱ्यांशी बातचीत केली तेव्हा एक आगळीवेगळी माहिती हाती लागली. शिवछत्रपतींचे गडकिल्ले कसे पहावेत. त्यांच्याशी कसा संवाद साधावा हे आपल्या लेखणीतून मांडणारे एक गडवेडे, ज्यांनी किल्ल्यांवर जितकं प्रेम केले त्यापेक्षा जास्त कशावरही केले नाही असे शिवप्रेमींचे लाडके आप्पा  म्हणजेच गो. नी. दांडेकर.  त्यांनी गडकोटांवर, त्यांच्या अनुभवावर अनेक पुस्तके लिहून हातावेगळे केले आहेत. अशा गडतपस्वी कै. गो. नी. दांडेकर यांनी १९८३ साली लिहिलेल्या 'दुर्गभ्रमणगाथा' या पुस्तकात संभाजीराव भिडे गुरुजींबद्दल लिहिताना ते म्हणतात... "आमच्या संभाजी भिड्यांचं पत्र आलं. 'सांगली जिल्ह्यातून चारशे जवान घेऊन राजगड मा...

कोरेगाव भीमा लढाईच्यावेळी महार रेजिमेंटच नव्हती ? काय आहे सत्य ?

इमेज
१ जानेवारी १८१८ च्या कोरेगाव - भीमा लढाईत पेशवे किंवा इंग्रज यांच्यापैकी कुणीही ही लढाई जिंकलं अथवा हरलं नाही अशी गोप्यस्फोट करणारी माहिती इतिहास संशोधक चंद्रकांत शामराव पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी समितीपुढे बुधवारी मांडली आहे.  चंद्रकांत पाटील यांनी पुरावा म्हणून शेकडो पानांसह प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कोलकाता हायकोर्टाचे माजी सरन्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीपुढे सुनावणी सुरू आहे. कोरेगाव भीमाची लढाई बडोद्याच्या गायकवाडांचे मंत्री गंगाधर शास्त्री पटवर्धन यांची हत्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू त्रिंबकजी डेंगळे यांनी घडवल्यावरून झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. ही लढाई कुठल्याही जाती वा धर्माशी संबंधित नव्हती असे सांगतानाच पाटील यांनी प्रसारमाध्यमांमध्ये आलेली ५०० महार व पेशव्यांचे २८ हजार सैनिक यांच्यात झाल्याची माहिती संशयास्पद असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.  महार रेजिमेंटची स्थापना १९४१ साली झाली, त्यामुळे त्यांचा १८१८ च्या लढाईत सहभाग असण्याचा प्रश्नच येत नाही . असा दावा पाटील यांनी केला आहे. गेले पाच महिने आपण जयस्तंभाश...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'ते' मत जे आज सत्यात उतरलं

इमेज
आजपासून १०२ वर्षापूर्वी १९१७ ला कॉग्रेस पक्ष आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार झाला. या करारात मुसलमानांना जास्तीतजास्त हक्कांच्या सवलती देउन त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी कॉंग्रेस पक्षाने मान्य केली होती. " भाषावार प्रांतरचनेचे तत्व स्विकारून बंगाल, पंजाब, सिंध, बलुचिस्तान व वायव्य सरहद्द प्रांत हे मुसलमान बहुसंख्याक होतील आणि त्या प्रांतात राहणारे हिंदू हे अल्पसंख्याक होतील आणि ते तिथे सुरक्षित राहू शकणार नाही. त्यांच्यावर अत्याचार होतील. अशा प्रकारची प्रांत रचना हिंदुस्थानच्या दृष्टीने धोकादायक आहे. असे मत  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले होते. कारण हिंदुस्थानात हिंदू आणि मुसलमान हे दोन समाज राहत नसून दोन भिन्न संस्कृतीची राष्ट्रे नांदत आहेत" असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. "हिंदुस्थानाच्या एका बाजुला चीन आणि जपान ही राष्ट्रे तर दुसऱ्या बाजुला अफगाणिस्तान अशी मुस्लिम राष्ट्र आहे. भविष्यात जर चीन किंवा जपानने हिंदुस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर देशाच्या रक्षणासाठी हिंदू - मुसलमान एकजुटीने प्रतिकार करतील ..... पण .... पण जर अफगाणिस्तानने...