पोस्ट्स

जयपूर येथील प्रसिध्द जंतर मंतर आणि महाराष्ट्र संबंध

इमेज
Jaipur डायरी - बळवंतराव दळवी मध्यंतरीच्या काळात माझं जयपूरला जाणं झालं. तिथले आमेर पॅलेस, जयगड फोर्ट, हवामहल, जलमहल, म्युझियम अशी अनेक ठिकाणं पाहिली, पण यापैकी अनेक ठिकाणं ही फक्त खास राण्यांसाठी बांधली होती हे समजल्यावर मला जयपूर मधील एकच ठिकाण आवडलं.... 'जंतर मंतर'  खर तर इथे कोणतेही मंत्र वैगेरे नाही तर इथे अनेक यंत्र आहेत. याला यंत्र  वेधशाळा या शब्द योग्य. पण उत्तर भारतात 'य' चा उल्लेख 'ज' केला जातो जसे आपल्याकडे जाधव पण तिथे यादव. तसेच यंत्रच्या जागी जंत्र त्याचाच पुढे जंतर झालं ! पहिल्यांदा गेलो तेव्हा इथले अनेक यंत्र पाहिले... हे यंत्र वेळ, काळ, राशी, नाडी अशावर सूर्याचा होणारा प्रभाव दर्शविणारी आहेत. हे यंत्र समजून घेण्याचा प्रयत्न केला काही यंत्र नाही समजले. ठरवून दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहायला गेलो. यावेळी अभ्यासून ते यंत्र पाहिले. व्हिडिओ काढले ते लवकरच माझ्या YouTube चॅनल वर टाकणार आहेच. जयपूर मधील गाईड त्यांच्या राजाबद्दल खूप भरभरून बोलले... पण आम्हाला जयपूर फिरवणाऱ्या ड्राइव्हरने सांगितलं ते ऐकून आपल्या महाराष्ट्रातील गडक...

गडावर भेटणारा तो अनोळखी गडी

इमेज
आपल्याला कुठे जायचे आहे. कुठल्या मार्गाने जायचे आहे. यांचे आणि आपले नाते नक्की कधी जुळले ? काय आहे हे नातं ? कोण आहेत की निष्ठावंत साथ देणारी आणि तुमच्याकडून काहीच अपेक्षा न ठेवणारी  ? गडाचा सगळा घेरा, त्यांच्या वाटा सर्व काही यांना आधीच ठाऊक असल्यासारखं, गडावरील प्रत्येक ठिकाण यांना ठाऊक असते. कोण असतात ही.....                गडावर भेटणारा तो अनोळखी गडी           --------------------------------------                                          - बळवंतराव दळवी ओळख नाही पाळख नाही न त्याला आपण स्वतःहून गडकिल्ल्यावर जातानाचा संदेश दिला असतो. पण जणू आपण गडावर येणार हे त्याला आधीच कोणी सांगितलेलं !  कधी तो फार पुढे तर कधी वाट बघत दुरुन आपल्याकडे लक्ष ठेवू असतो. आपण थोडा विसावा घेतो. तो लगेच आपल्या जवळ येतो. आपल्याकडे पाहतो. जणू म्हणत असतो,  "चाला बिगीन बिगीन लैय चढ हाय अजून." तो पुढे असल्याने आपल्याल...

महर्षी व्यासांनी दिलेली संधी

इमेज
आपल्या धर्म ग्रंथातून काय शिकायला हवं ....? महाभारतात महर्षी व्यासांनी एकदा चुकलेल्या लोकांना पुन्हा दिलेली संधी.... एकदा नक्कीच वाचा..... महर्षी व्यासांच्या महाभारतात चुकलेले ऋषी आहेत, चुकलेले राजे आहेत, चुकलेल्या स्त्रिया आहेत, चुकलेल्या माता आहेत. पण व्यासांनी एकदा चूक झाली म्हणून चुकलेल्याला कायमचा गारद ( बाद ) करून टाकले नाही. चूक करूनही प्रत्येकाला आपल्या व्यक्तीत्वाच्या वैशिष्ट्यांने विकासाची ( चूक सुधारण्याची ) संधी दिली आहे. जगात सगळेच चांगले असतं नाहीत. जे चांगले आहेत त्यांचेही सगळंच चांगलं असणे शक्य नाही. तसेच वाईट म्हणून ज्याची अपकिर्ती झालेली असते, त्यांच्यात सुध्दा चांगलेपणाचा काही भाग असतो..  ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर... गुरु द्रोणपुत्र अश्वत्थामा मारला गेला नसतानाही  'नरो वां कुंजरावो'  "अश्वत्थामा मारला गेला" हे मोठ्याने उच्चारले पण त्यानंतर पुढचं वाक्य खालच्या आवाजात म्हटलं ... "मारला गेला तो अश्वत्थामा नसून हत्ती होता " अस म्हणून असत्याचे पाप धुवून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा धर्मराज युधिष्ठिर ज्येष्ठ  पांडव पुत्र ... द्रोणांच्या मृत्...

श्री नर्मदा परिक्रमा आणि भिडे गुरुजींचा धारकरी

इमेज
श्री नर्मदा परिक्रमा आणि भिडे गुरुजी ! साधारण माणसांचा एकदाच जन्म होतो. जन्म, शिक्षण, लग्न, पोरंबाळ, संसार, म्हातारपण आणि शेवटी मरण ! यात विशेष असं काहीच नसत .आमचाही पहिला जन्म असाच झाला. सगळचं साधारण ! या साधारण आयुष्याच्या वाटेवर आम्हांला भिडे गुरुजी नावाच्या तरूण म्हाताऱ्याने आमच्या हातात शिवचरित्र ठेवलं. सत्व, स्वाभिमान, देव, देश, धर्म हळूहळू  समजु लागला. इतिहास आवडु लागला. या गुरूजींनी आम्हांला शिवकाळ दाखवला. सह्याद्री दाखवला. आंम्हाला मोहिम नावाचा संजीवनी मंत्र आमच्या अंगात भिनवला. मनं पेटवल. धमन्या फरफरु लागल्या. भिडे गुरुजी म्हणजे राष्ट्रतेजाचा झंझावात.  लाखो तरुणांना शिवप्रभुंची वाट दाखवणारा हाच तो अवलिया!  हजारो तरुणांना निर्व्यसनी बनविणारा हाच तो संत. नेहमी खरं बोलायला लावणारा हाच तो महंत ! बाकी साधु , संत ,मंहाताची व्याख्या अनेक बैलांना न समजण्याच्या पलिकडची आहे. मुर्दाड जिवन जगणाऱ्या लोकांना संतमहंताची व्याख्या सहसा समजणार नाही. हे दुर्देव आहे महाराष्ट्रच ........ महाराष्ट्राला शिवछत्रपती सुध्दा अजुनही समजले नाहीत. समजले असते तर महाराष्ट्र काही और...

पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता ?' या पुस्तकाची दूसरी बाजू

इमेज
म. फुले इतिहाससंशोधक नव्हते किंवा इतिहासकार नव्हते. समतेचा पुरस्कार व प्रचार करणारे कर्ते सुधारक म्हणून त्यांनी शिवाजीस असे म्हटले असेल म्हणून त्यांचा पोवाड्याचा आधार दूर करता येणे शक्य आहे ." (पान क्र. ५०) शिवाजी कोण होता ? या पुस्तकात स्व. गोविंद पानसरे लिहितात... --------------------------------------------------------                          ● शिवाजी आणि धर्म - "शिवाजी हिन्दू होता. शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला व त्याची कर्मभुमीही महाराष्ट्रच होती. यामुळे हिंदूंना शिवाजीसंबंधी अभिमान वाटतो. त्यातल्यात्यात महाराष्ट्रीय हिंदूंना जरा जास्तच अभिमान वाटतो.  (पान क्र. २३) ● देवळांची लुट, मोड़तोड इत्यादि - मुस्लीम संघटनांचे त्याच्या अनुयायांना प्रतिपादन असते की,हिंदू धर्म म्हणजे काफरांचा धर्म. आपल्या पूर्वजांनी तो बुडवण्यासाठी प्रयत्न केले ते बरोबरच केले. जमले तर आपणही तसेच करावे. निदान हिंदूंविरुध्द आपणअसावे" असा त्यांचा प्रचार असतो व आहे . आपण राज्यकर्ते (होतो) परंतु राज्यकर्ते म्हणून आपले महत्व नाही ही खंत आणि त्य...

शिवछत्रपती गो- ब्राह्मण प्रतिपालक वाद

इमेज
.              गो - ब्राह्मणप्रतिपालक  शिवछत्रपतींनी देवाचे, धर्माचे, देशाचे, गाईंचे, प्रजेचे, ब्राह्मणांचे, आणि स्त्रीयांचे रक्षण केले हे ऐतिहासिक सत्य आहेच ....  पण ... शिवकाळात शिवछत्रपतींनी जेव्हा सिंहासनारोहण केले तेव्हा त्यांनी स्विकारलेली बिरुदावली 'क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज' हीच बिरुदावली स्विकारली होती हेही सत्य आहे जे कोणीही नाकारत नाही .... तरीही .... जसे समर्थ रामदास स्वामी यांनी शिवछत्रपतींना उद्देशून त्यांना ' शिवराय, श्रीमंत योगी, जाणता राजा संबोधतात कारण समर्थ रामदास स्वामींना शिवछत्रपतीं त्याच रुपात दिसले म्हणून ते तस म्हणतात. तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या बाकरे शास्त्रींच्या दानपत्रात शिवछत्रपतींचा उल्लेख म्लेंच्छक्षयादिक्षित , आपले पणजोबा मालोजीराजे भोसले यांचा उल्लेख देवब्राह्मण प्रतिपालक असा उल्लेख करतात. आपल्या आजोबांचा शहाजीराजांचा उल्लेख हिंदू धर्माचा जीर्णोद्धार करणारे म्हणतात याचा अर्थ स्पष्ट आहे की, संभाजीराजांना हे ठाऊक आहे की, शिवरायांनी म्लेंच्छ म्हणजेच मुसलमानांना संपवण्य...

शेक्सपियरचे जगप्रसिद्ध हॅमलेट नाटक आणि भगवदगीता

इमेज
प्रसिद्ध इंग्रजी नाटककार शेक्सपियर याच्या ' हॅमलेट ' या जगप्रसिद्ध नाटकात डेन्मार्क देशाचा राजपुत्र हॅमलेट याच्या चुलत्याने राज्यकर्ता आपल्या सख्ख्या भावाचा म्हणजे हॅमलेटच्या वडिलांचा खून करून व आपल्याच भावाच्या पत्नीशी हॅमलेटच्या आईशी लग्न करून राजगादीही बळकावली होती. आपल्या वडिलांना मृत्यू प्रसंगी दिलेला शब्द पाळायचा आणि त्या पापी नराधमाचा वध करून वडिलांच्या ऋणातून पुत्रधर्मातून मुक्त व्हावे, कि सख्या चुलता, आपल्या आईचा दुसरा नवरा आपला सावत्र बाप, आणि तख्तावर विराजमान असलेला राजा म्हणून त्याची गय करावी या द्विधा मनस्थितीत पडून कोवळ्या मनाच्या तरुण हॅमलेटची काय अवस्था झाली यावर ते नाटकं आहे.  ' to be or not to be .... जगावं कि मरावं ' अशा विवंचनेत त्या बिचाऱ्या हॅमलेटला वेड लागून त्याचा अंत झाला .... असं ते जगप्रसिद्ध नाटकं उभ्या जगाने डोक्यावर घेतलं ! आपण भारतीय नेहमीच दुसऱ्या परदेशी लोकांवर जास्त विसंबून राहतो आणि ते काय लिहितात सांगतात यावर फार लक्ष देतो. आपल्याकडे काय चांगल आहे याचा आपण भारतीय फार विचार करत नाही ! महाभारतात ऐन युध्दभुमीवर अर्जुनाने समोर...